Lok Sabha Election 2024: एकनाथ शिंदे चक्रव्यूव्हात अडकले.. भाजप-राज ठाकरे करणार शिंदेच्या 'या' जागांवर कब्जा
Lok Sabha Election 2024, Raj Thackeray seat Demand : मनसेने केलेल्या जागांची मागणी पाहता, शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. कारण ज्या जागांच्या मागणीवर मनसे आग्रही आहे, त्या जागा महायुतीत शिंदेच्या वाट्याला येतातय. त्यामुळे शिंदे जागावाटपात माघार घेणार? की राज ठाकरेंना त्यांच्या मागणीनुसार जागा मिळणार?
ADVERTISEMENT
Lok Sabha Election 2024, Raj Thackeray seat Demand : महायुतीत आता चौथा भिडू दाखल होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रूपाने हा चौथा भिडू महायुतीत असणार आहे. मात्र तत्पुवी मनसेची महायुतीसोबत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान मनसेने केलेल्या जागांची मागणी पाहता, शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. कारण ज्या जागांच्या मागणीवर मनसे आग्रही आहे, त्या जागा महायुतीत शिंदेच्या वाट्याला येतातय. त्यामुळे शिंदे जागावाटपात माघार घेणार? की राज ठाकरेंना त्यांच्या मागणीनुसार जागा मिळणार? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. ( lok sabha election 2024 raj thackeray mns join mahayuti seat sharing clashes with eknath shinde seat maharashtra politics)
ADVERTISEMENT
खरं तर राज ठाकरेंनी महायुतीत दाखल होण्यासाठी 3-4 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. मनसेने मागितलेल्या या जागा पाहिल्या असत्या त्या महायुतीच्या जागावाटपात शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला येत आहेत. जसे एकनाथ शिंदे यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्यासाठी दक्षिण मध्य मुंबईच्या जागेची मागणी केली आहे. खासदार गजानन किर्तीकर यांच्यासाठी उत्तर पश्चिम मुंबईची मागणी केली आहे. आणि नाशिक लोकसभा हेमंत गोडसे आणि शिर्डी लोकसभा सदाशिव लोखंडे या उमेदवारांसाठी मागितली आहे. मात्र याच जागेंवर आता राज ठाकरेंनी मागणी केली आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी शिदेंच्या जागा मागण्याचे कारण काय?
हे ही वाचा : Eknath Shinde : "तिकीट मिळेल की नाही, हे..."; एकनाथ शिंदेंचा आमदारांना स्पष्ट मेसेज
तरं त्याच असं झालंय शिवसेनेनंतर मराठी मतांवर मनसेची सर्वांधिक पकड आहे. तसेच याआधी मनसेचा निवडणुकीचा इतिहास पाहिला असता, मनसेने पहिल्यांदा 2009 मध्ये लढलेल्या निवडणुकीत 13 जागा जिंकल्या होत्या. त्या 13 जागा मनसेने शिवसेनेची ताकद असलेल्या मतदार संघात जिंकल्या होत्या. त्यामुळे एक गोष्ट अधोरेखीत होते ज्या ठिकाणी मुंबईत शिवसेनेची ताकद आहे, त्या जागांवर राज ठाकरेंचे प्राबल्य देखील आहे.
हे वाचलं का?
दरम्यान दक्षिण मध्य मुंबईत बाळा नांदगावकर, उत्तर पश्चिम मुंबईतून शालिनी ठाकरे, नाशिक किंवा शिर्डी यापैकी एका जागेवर अमित ठाकरे...असा सगळा फॉर्म्युला मनसेचा ठरला आहे. राज ठाकरेंनी ज्या जागांची मागणी केली आहे. त्या जागांवर मनसेची ताकद खूप जास्त आहे. त्यात मुंबईत ठाकरेंची मते फोडण्यासाठी त्यांच्यासारखाच ठाकरी ब्रॅन्ड मैदानात उतरवावा लागणार आहे. त्यामुळे राज ठाकरे चांगला पर्याय आहे. त्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे, पवार आणि गांधीवर बेछुट टीका करू शकतात.त्यामुळे ठाकरेंची मते फोडण्यात राज ठाकरे प्रभावी ठरु शकतात. त्यामुळे राज ठाकरेंची महायुतीतली एंन्ट्री महत्वाची ठरते.
हे ही वाचा : मोदी सरकारला निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाचा दणका!
दरम्यान आता शिंदेच्या वाटेला आलेल्या जागा राज ठाकरेंना मिळणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT