Lok Sabha Elections 2024 : शरद पवारांचा महादेव जानकरांनी केला 'गेम'! महायुतीत मोठी घडामोड

मुंबई तक

Mahadev Jankar Latest news : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीसोबतच राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यांना एक जागा दिली जाणार आहे.

ADVERTISEMENT

महादेव जानकर यांनी शरद पवारांना धक्का दिला.
शरद पवार यांच्याकडून महादेव जानकर यांना मविआमध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू असताना महायुतीने दिला धक्का.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महादेव जानकर यांचा यु टर्न

point

राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीसोबतच राहणार

point

बारामती मतदारसंघातील समीकरणे बदलणार

Mahadev Jankar Lok Sabha elections 2024 : (दिपेश त्रिपाठी, मुंबई) शरद पवारांना महायुतीने जोरदार झटका दिला. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न पवारांकडून सुरू असताना आज महायुतीने डाव उलटवला. महादेव जानकर यांना एक जागा देण्यात आले असून, ते महायुतीमध्येच राहणार हे स्पष्ट झाले आहे. (Mahayuti Allocates one seat to Mahadev Jankar party in lok sabha election 2024)

महादेव जानकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सुनील तटकरे, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थिती बैठक झाली. या बैठकीत एक जागा देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर सुनील तटकरे यांनी याची माध्यमांना माहिती दिली. 

डाव फिरला... सुनील तटकरे काय बोलले?

"राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. याबैठकीत सविस्तर चर्चा केली. जानकर यांनी महायुतीमध्ये राहणार असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. महायुतीची एक जागा देण्याचा निर्णय घेतला आहे." 

महादेव जानकरांच्या बदलेल्या भूमिकेचे परिणाम काय? बघा हा व्हिडीओ

"महायुतीचे जागावाटप होईल त्यावेळी त्यांना कुठला मतदारसंघ देण्यात आला आहे, ते जाहीर केले जाईल. महादेव जानकर यांच्यामुळे महायुती अधिक बळकट होईल. ४५ पेक्षा जास्त जागांचे उद्दिष्ट आहे. त्याला ताकद मिळेल." 

mahadev jankar will continued alliance with mahayuti
महादेव जानकर यांची महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक झाली. त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेले निवेदन.

हेही वाचा >> 'अजित पवार विंचू'; शिवतारेंनी फुंकलं रणशिंग; पुढचा प्लॅन काय?

"आम्ही एकत्रित बसू आणि कोणत्या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवावी, याचा निर्णय घेणार आहोत. आमची ८५ ते ९० टक्के संपली आहे. पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. अतिशय समन्वयाने आणि मित्रपक्षाला सन्मानजनक स्थान देण्याची भूमिका आहे", असे तटकरे यांनी सांगितले. 

अजित पवारांची एक जागा होणार कमी?

महादेव जानकर यांना एक जागा देण्याच आली आहे. ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातून दिली गेल्याचे सांगण्यात येत आहे. महादेव जानकर यांना शरद पवार यांनी माढाची जागा देण्याची तयारी दर्शवली होती. पण, महायुतीने आधीच डाव साधला आहे. आता जानकर यांना माढाची जागा देण्यात येते की परभणीची हे बघावे लागले. पण, मिळालेल्या माहितीनुसार जानकर यांना परभणीतूनच उमेदवारी देण्याची शक्यता जास्त आहे. 

बारामतीतील समीकरण बदलणार

महादेव जानकर यांना महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा प्रयत्न बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने सुरू होता. बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर मतदार आणि महादेव जानकर समर्थकांची संख्या मोठी आहे.

हेही वाचा >> राणांना निवडणूक जाणार जड, बच्चू कडू उतरवणार 'भिडू'! 

त्यामुळे जानकर यांची भूमिका बारामती लोकसभा मतदारसंघात निर्णायक आहे. त्यामुळेच जानकर कुणाकडे जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. शरद पवारांची भेट घेऊन जानकर यांनी महायुतीवर दबाव निर्माण केला होता. त्याची परिणीती आता दिसून आली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp