Mumbai Exit poll : मुंबईत कुणाची डरकाळी? 6 जागांचा निकाल कुणाच्या बाजूने?

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबईतील तीन जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे.
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघामध्ये कोण जिंकतंय?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

point

मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांचे निकाल २०२४

point

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक २०२४

Maharashtra Lok Sabha exit polls : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची पिछेहाट होताना दिसत आहे. पण, मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघाचे निकाल काय असतील, याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे. या सहापैकी पाच जागा महाविकास आघाडी जिंकताना दिसत आहे. टीव्ही ९ पोलस्ट्राट, पिपल्स इनसाईट्स एक्झिट पोल आणि रुद्रा रिसर्च अ‍ॅण्ड अनॅलिटीक्सच्या  एक्झिट पोलचे असे अंदाज आहेत. (exit polls prediction about six Mumbai lok sabha seats)

ADVERTISEMENT

मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला चांगले यश मिळेल, असे एक्झिट पोलचे अंदाज आहेत. महत्त्वाचे म्हणजे यामुळे शिंदेंना मुंबईत झटका बसताना दिसत आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघ, त्या मतदारसंघातील उमेदवार आणि कोण जिंकू शकतं? याबद्दल एक्झिट पोल काय आहे, हेच जाणून घ्या...

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा

टीव्ही 9 पोलस्ट्राट, पिपल्स इनसाईट्सच्या एक्झिट पोलनुसार उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांचा विजय होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रवींद्र वायकर यांना ऐनवेळी रिंगणात उतरवले होते.

हे वाचलं का?

हेही वाचा >> 'या' 5 राज्यांनी बिघडवलं INDIA आघाडीचं गणित, भाजपची मुसंडी? 

गजानन कीर्तिकर खासदार राहिलेल्या या मतदारसंघात यावेळी त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर जिंकतील असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. 

दुसरीकडे रुद्रा रिसर्च अ‍ॅण्ड अनॅलिटीक्सच्या एक्झिटपोलमध्ये अमोल कीर्तिकर हे ५० हजार ते ७० हजारांच्या मताधिक्याने निवडून येऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे या मतदारसंघांच्या निकालाबद्दल उत्सुकता वाढली आहे. 

ADVERTISEMENT

उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघ

भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लोकसभा मतदारसंघात यावेळी सत्तांतर होण्याचा अंदाज आहे. या मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत आहे. 

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय दिना पाटील विरुद्ध भाजपचे मिहीर कोटेचा यांच्यात सामना आहे. गुजराती व्होटबँक विरुद्ध मराठी मतदार असा सुप्त प्रचार या मतदारसंघात बघायला मिळाला.

हेही वाचा >> उद्धव ठाकरे महाराष्ट्रात 48 पैकी 'या' 14 जागा जिंकणार? 

टीव्ही 9 पोलस्ट्राट, पिपल्स इनसाईट्सच्या एक्झिट पोलनुसार उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून संजय दिना पाटील जिंकतील, तर मिहीर कोटेचा पराभूत होतील. भाजपने या मतदारसंघात उमेदवार बदलला होता. मनोज कोटक यांच्याऐवजी भाजपने कोटेचा यांना उमेदवारी दिली पण, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागू शकते, असे एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.

दुसरीकडे रुद्रा रिसर्च अ‍ॅण्ड अनॅलिटीक्सच्या एक्झिट पोलनुसार संजय दिना पाटील हे कोटेचा यांचा ६० हजार ते ९० हजार मतांनी पराभव करतील.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ

दक्षिण लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत विरुद्ध एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्यात लढत आहे. या एक्झिट पोलनुसार अरविंद सावंत विजयी होण्याची शक्यता आहे. अरविंद सावंत ५० हजार ते ७० हजार मते घेऊ जिंकू शकतात. 

उत्तर मध्य मुंबई लोकसभा

२०१४ आणि २०१९ मध्ये प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. पण, यावेळी भाजपने या मतदारसंघात उमेदवार बदलला. प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना भाजपने उमेदवारी दिली. तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या वर्षा गायकवाड यांना काँग्रेसने उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी दिली. 

या मतदारसंघात भाजपला धक्का देणारा निकाल लागू शकतो असा अंदाज आहे. उज्ज्वल निकम यांचा पराभव होईल असा अंदाज असून, वर्षा गायकवाड विजयाचा गुलाल उधळतील असे एक्झिट पोलचे अंदाज आहेत. 

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. ठाकरेंनी अनिल देसाई यांना राहुल शेवाळे यांच्या विरोधात रिंगणात उतरवलं आहे. टीव्ही ९ पोलस्ट्राट, पिपल्स इनसाईट्स एक्झिट पोलनुसार राहुल शेवाळे या मतदारसंघात विजयी होतील. तर रुद्रा रिसर्च अ‍ॅण्ड अनॅलिटीक्सच्या  एक्झिट पोलनुसार अनिल देसाई १० हजार ते २० हजार मतांच्या फरकाने जिंकू शकतात. 

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ

गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापत भाजपने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली. महाविकास आघाडीत काँग्रेसला सुटलेल्या या जागेवर भूषण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, भूषण पाटील यांचा पराभव होईल, असा अंदाज आहे. टीव्ही ९ पोलस्ट्राट, पिपल्स इनसाईट्स एक्झिट पोलनुसार पीयूष गोयल यांचा विजय होईल, असा अंदाज आहे. रुद्रा रिसर्च अ‍ॅण्ड अनॅलिटीक्सच्या  एक्झिट पोलनुसार पीयूष गोयल यांचा अडीच ते तीन लाख मतांनी विजय होईल. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT