Satara Lok Sabha election 2024 : उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण उतरणार मैदानात?

मुंबई तक

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेससमोर उमेदवार निवडीचा पेच निर्माण झाला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारातून निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सातारा लोकसभा मतदासंघ निवडणूक

point

राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवाराचा शोध

point

जयंत पाटलांनी घेतली पृथ्वीराज चव्हाणांची भेट

Satara Lok Sabha 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यामुळे शरद पवारांसमोर मोठा पेच उभा राहिला आहे. भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली जाणार असून, त्यांच्याविरोधात ताकदीचा उमेदवार उतरवण्याचे आव्हान पवारांसमोर आहे. त्यादृष्टीने चाचपणी सुरू असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना साताऱ्यातून उमेदवारी दिली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. 

ADVERTISEMENT

श्रीनिवास पवार यांनी प्रकृतीच्या कारणामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यामुळे साताऱ्यातून शरद पवार कुणाला उमेदवारी देणार, हा प्रश्न चर्चिला जात आहे. त्यात रविवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. 

श्रीनिवास पवार यांनी नकार दिल्यापासूनच पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत होते. त्याला जयंत पाटील यांच्या भेटीने आणखी हवा मिळाली. 

हे वाचलं का?

पृथ्वीराज चव्हाण-जयंत पाटलांमध्ये तासभर चर्चा

कराड येथील पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी जयंत पाटील भेट घेतली. सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा शरद पवारांचा मेसेज घेऊन पाटील चव्हाणांना भेटल्याचे राजकीय वर्तुळातून सांगितले जात आहे.

हेही वाचा >> "पुरंदरचा मांडवली सम्राट"; विजय शिवतारेंवर सडकून टीका, पत्र व्हायरल 

सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार नसल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडूनही पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीची मागणी केली जात आहे. पृथ्वीराज चव्हाण या मतदारसंघातून उभे राहिल्यास उदयनराजे भोसलेंविरोधात मोठं आव्हान निर्माण होऊ शकते, असा सूर स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "फडणवीस मला उमेदवारी देणार होते, पण शिंदेंना...", आठवलेंचा गौप्यस्फोट 

श्रीनिवास पवार यांच्या माघारीनंतर शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नावांची चर्चा होती. पण, यापैकी कुणालाही तिकीट दिल्यास तितकी तगडी फाईट होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच पवारांकडून चांगल्या उमेदवाराची चाचपणी केली जात आहे. यात पृथ्वीराज चव्हाण यांचे नावे पुढे आहे. 

ADVERTISEMENT

पक्ष चिन्ह... जागांची आदलाबदल

सातारा लोकसभेची जागा आघाडीमध्ये राष्ट्रवादीकडे राहिलेली आहे. पण, आता पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी द्यायची झाल्यास चिन्हाचा प्रश्न उद्भवू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असलेला हा मतदारसंघ काँग्रेसलाही दिला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. त्याबद्दल्यात राष्ट्रवादी काँग्रेस भिवंडीची जागा आपल्याकडे घेऊ शकते. त्यामुळे साताऱ्यात उमेदवार कोण असणार, याबद्दल उत्सुकता वाढली आहे. 

पृथ्वीराज चव्हाण माजी खासदार

1990 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी कराड लोकसभा असा हा मतदारसंघ होता. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात आली आणि 1999 मध्ये श्रीनिवास पाटील यांना तिकीट देण्यात आले. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला होता. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT