Pune Lok Sabha Election 2024 : पुण्यात नवा ट्विस्ट, भाजपच्या मोहोळांना काकडेंचं चॅलेंज... धंगेकर मारणार बाजी?

मुंबई तक

Pune Lok Sabha Election 2024 : मी इच्छुक होतो, आजही आहे आणि एबी फॉर्म भरला जात नाही, तिथपर्यंत मी इच्छुक असेन, असे संजय काकडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता काकडेंच्या या भूमिकेवर पक्ष काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ADVERTISEMENT

मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारीला भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
pune lok sabha election 2024 bjp cnadidate murlidhar mohol ex mp sanjay kakade
Google CTA

Pune Lok Sabha Election 2024 : अमरावती, माढा पाठोपाठ आता पुण्यात भाजप उमेदवार बदलाची मागणी जोर धरू लागली आहे. पुण्यातून भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केली होती. या उमेदवारीविरोधात आता   भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मी इच्छुक होतो, आजही आहे आणि एबी फॉर्म भरला जात नाही, तिथपर्यंत मी इच्छुक असेन, असे संजय काकडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता काकडेंच्या या भूमिकेवर पक्ष काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  (pune lok sabha election 2024 bjp cnadidate murlidhar mohol ex mp sanjay kakade) 

माजी खासदार संजय काकडे माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना काकडे म्हणाले की, मी इच्छुक होतो हे जग जाहीर होते. फायनल उमेदवार मीच होतो, पण आता उमेदवारी जाहीर झाली आहे. मी माझं दुखणं पक्षाला सागितले आहे. रडल्या शिवाय आता दुःख कळत नाही. रविंद्र चव्हाण यांना मी वस्तुस्थिती सागितली असल्याचे संजय काकडे यांनी सांगितले आहे. 

हे ही वाचा : रश्मी बर्वेंचं जात प्रमाणपत्र रद्द, काँग्रेसचा दुसरा उमेदवार कोण?

दरम्यान बुधवारी भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी संजय काकडे यांची भेट घेतली होती. या भेटीत काकडे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मी माझी भूमिका सांगितली आहे. पुण्यातला सर्व्हे त्यांना सांगितला, तो जाहीर सांगता येत नसतो. पण मी उमेदवारीवर त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यात कसे पुढे जावे अस सगळं सागितले असल्याचे संजय काकडे म्हणाले आहेत.

दरम्यान पक्षाच्या नेत्यांकडे मी माझी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच नाव अधिकृत जाहीर होतात पण बी फॉर्म भरेपर्यंत मी इच्छुक आहे,असे संजय काकडे यांनी सांगितले आहे.