Pune News : "मंत्र्यांनी कार्यालयात बोलावून दबाव आणला", अधिकाऱ्याने शिंदेंवर टाकला लेटर बॉम्ब
Dr. Bhagwan Pawar big allegation : मी नियमबाह्य काम केली नाहीत. म्हणून माझ निलंबन करण्यात आलं आहे. जुन्या तक्रारी काढून समिती नेमून माझं निलंबन करण्यात आले आहे. तसेच मंत्री महोदयाच्या दबावामुळे हे माझ निलंबन करण्यात आले आहे, असा दावा डॉ.भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहलेल्या पत्रात केला आहे.
ADVERTISEMENT
Dr. Bhagwan Pawar big allegation : पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार (Dr. Bhagwan Pawar) यांना निलंबित करण्यात आलं आहे. महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने ही कारवाई केली होती. या कारवाईनंतर डॉ.भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले आहेत. पवारांच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. (pune news dr bhagwan pawar big allegation minister called katraj office and pressure extra tender work wrote letter cm eknath shinde vijay waddetiwar)
ADVERTISEMENT
पत्रात काय?
कात्रज कार्यालयात बोलावून नियमबाह्य टेंडरची कामं, इतर खरेदीबाबत दबाण आणला. पण मी नियमबाह्य काम केली नाहीत. म्हणून माझ निलंबन करण्यात आलं आहे. जुन्या तक्रारी काढून समिती नेमून माझं निलंबन करण्यात आले आहे. तसेच मंत्री महोदयाच्या दबावामुळे हे माझ निलंबन करण्यात आले आहे, असा दावा डॉ.भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहलेल्या पत्रात केला आहे.
हे ही वाचा : 'ठाकरेंचे अनेक आमदार शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर...'
भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड अन् प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई?
विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी देखील या प्रकरणात महायुती सरकारवर टीका केली. महायुती सरकारमध्ये फक्त टेंडर काढण्याची स्पर्धा असते. जे भ्रष्ट अधिकारी मंत्र्यांच्या आदेशाने नियमबाह्य काम करतात त्यांचे पूर्ण लाड पुरवले जातात. जे नियमबाह्य काम करत नाही त्यांचा महायुतीतील मुजोर आणि भ्रष्ट मंत्री कसा छळ करतात त्याचा मोठा पुरावा समोर आला आहे, असे विजय वड्डेटीवार यांनी एक्सवर म्हटलं आहे.
हे वाचलं का?
पुणे मनपा आरोग्य प्रमुख डॉ.भगवान पवार यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निलंबन मागे घ्यावे म्हणून पत्र लिहिले आहे. मंत्र्यांनी त्यांना बोलवून वारंवार नियमबाह्य काम करण्यासाठी दबाव टाकला, ते काम केले नाही म्हणून निलंबनाची कारवाई केली गेली याबाबत अनेक खुलासे करून मंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत.
हे ही वाचा : Mumbai Rain : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'या' दिवशी येणार मान्सून
आरोग्य खाते हे लोकांच्या आयुष्याशी निगडित आहे, अँब्युलन्स घोटाळा पासून अनेक विषयांवर आम्ही सरकारकडे जाब विचारला पण सरकार तिथे कारवाई करत नाही. प्रामाणिक अधिकारी या भ्रष्ट सरकारचा खरा चेहरा जाणते समोर आणत आहेत.
ADVERTISEMENT
या पत्राची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मंत्रीमंडळातील भ्रष्ट मंत्र्यांच्या टेंडर साठी प्रामाणिक अधिकाऱ्यांचा बळी देऊ नये. तीस वर्ष प्रामाणिक सेवा देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर स्वतःच्या न्यायासाठी पत्र लिहायची वेळ यावी ही घटना साक्ष देणारी आहे की राज्यात भ्रष्टाचारी सरकार आणि मंत्र्यांनी पापाचा कळस गाठला आहे, अशी टीका देखील विजय वड्डेटीवार यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
चौकशी समिती नेमली
दरम्यान या प्रकरणी आता आरोग्य सेवा आयुक्तालयाने 29 एप्रिल रोजी तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. भगवान पवार यांच्या विरूद्ध तक्रारीचे गंभीर स्वरूप पाहता निष्पक्ष चौकशी होण्याच्या दृष्टीने निलंबन आवश्यक आहे, अशी शिफारस समितीने केली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT