Rashmi Barve : रामटेकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! रश्मी बर्वेचा अर्जच ठरवला बाद... नवीन उमेदवार कोण?

योगेश पांडे

ADVERTISEMENT

rashmi barve Candidacy cancel election commission shyamkumar barve new candidate for ramtek lok sabha constituency
काँग्रेसच्या रामटेक लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द झाली आहे.
social share
google news

Rashmi Barve Candidacy cancel Election Commission : काँग्रेसच्या रामटेक लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द झाली आहे. आज सकाळीच त्यांच जातप्रमाणपत्र रद्द झालं होतं. त्यानंतर संध्याकाळी रश्मी बर्वे यांची उमेदवारी बाद ठरवण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि महायुतीसाठी हा मोठा धक्का बसला आहे. त्यात आता रामटेकमधून श्यामकुमार बर्वे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. (rashmi barve Candidacy cancel election commission shyamkumar barve new candidate for ramtek lok sabha constituency) 

रामटेकची जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे काँग्रेसने या मतदार संघातून रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून त्यांचा उमेदवारी अर्ज छाननीत रद्द करण्यात आला होता. 

हे ही वाचा : 'या' मतदारसंघांमध्ये ठाकरे-शिंदे थेट भिडणार, पाहा यादी

रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी विभागाने रद्द केलं होतं.त्यानंतर रामटेक लोकसभा मतदार संघातून त्यांची उमेदवारी अर्ज देखील बाद करण्यात आला. सुनील साळवे नावाच्या व्यक्तीने रश्मी बर्वे यांनी जात प्रमाणपत्र तयार करताना बनावट कागदपत्र दिल्याची तक्रार सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडे तक्रार केली होती. या प्रकरणी चौकशी करून अहवाल तत्काळ देण्याचा सुचना जात पडताळणी समितीला सामाजिक न्याय विभागाने केली होती. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यानंतर जात पडताळणी समितीने रश्मी बर्वे यांचे अनुसूचित जातीतील जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं.   यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकूण घेत सूनावणी पुर्ण केली. यानंतर जात वैधता समितीने जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याने उमेदवारी भरण्यास अपात्र ठरवत रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय दिला. तसेच रश्मी बर्वे यांच्यासोबत उमेदवारी अर्जासोबत डमी जोडलेला एबी फॉर्म वैध ठरवण्यात आला आहे. त्यामुळे आता रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. 

हे ही वाचा :Shiv Sena 1st List : शिवसेनेची पहिली यादी जाहीर, हेमंत गोडसेंना धक्का

रश्मी बर्वे काय म्हणाल्या? 

जो यांच्या विरोधात उभा राहता, त्यांच्यामागे अशाप्रकारचे कटकारस्थान हे सरकार करतं. या सरकारला लाज वाटली पाहिजे. एका शेतकऱ्याच्या अनुसूचित जमातीच्या महिलेच तुम्ही जात प्रमाणपत्र अवैध आहे असे तुम्ही तासाभरात ठरवता. तुम्ही होता कोण ठरवणारे? ही सरकारची हुकुमशाही आहे. ही हुकूमशाही फार काळ चालणार नाही. सध्या निवडणूक आयोगाने माझे पती श्यामकुमार बर्वे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली आहे, असे रश्मी बर्वे यांनी सांगितले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT