Sharad Pawar : "तीन महिन्यांनी मी राज्य तुमच्या हातात देतो", पवारांकडून सूचक संकेत
Sharad Pawar News : सत्तेचा उपयोग तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी केला जाईल, अशी स्थिती निर्माण करायची आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ आम्हाला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे देखील शरद पवारांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मोदींची गॅरंटी आता संपली.
तुम्ही तुमचा प्रतिनिधी निवडून दिलात.
Sharad Pawar Drought Tour : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीची (Assembly Election 2024) तयारी सुरू केली आहे. या तयारी दरम्यानच शरद पवारांनी राज्यात दुष्काळी भागांच्या पाहणी दौराही सुरु केला आहे. या दौऱ्यादरम्यान शरद पवारांनी (Sharad Pawar) मोठं विधान केले आहे. माझी खात्री आहे लोकसभा निवडणुकीत जे तुम्ही करून दाखवलं, ते आणखीण तीन महिन्यांनी (विधानसभेत) करून दाखवा, हे राज्य तुमच्या हातात देतो, असे आवाहन शरद पवारांनी बारामतीकरांना केले आहे. (sharad pawar big statement on baramati vidhan sabha election 2024 drouht tour in maharashtra)
ADVERTISEMENT
शरद पवार आज बारामतीत दुष्काळी दौऱ्यानिमित्त शेतकऱ्यांशी संवाद सांधत होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, निवडणूक झाली तुम्ही काय करायचे ते काम उत्तम केलं. त्यात काही कमतरता भासू दिली नाही. पावसाची कमरता आहे, पण मतांची कमतरता भासू दिली नाही, आणि तुम्ही तुमचा प्रतिनिधी निवडून दिला, असे शरद पवार बोलताच एकच हशा पिकला.
हे ही वाचा : आता BJP काय करणार? राज ठाकरेंना हव्या विधानसभेच्या 'एवढ्या' जागा!
मोदींची गॅरंटी आता संपली, ही गॅरंटी लोक ऐकत होते, मात्र त्यात आता बदल झाला. ही संपवण्याची ताकद तुमच्यात होती. या देशामध्ये आम्हा लोकांपेक्षा शहाणपणाचे निकाल तुम्ही देता. सामान्य माणूस हा शहाणा आहे. त्या सामान्य माणसाच्या शहाणपणाच्या जोरावर निर्णय घेतले जातात आणि मोठ्या मोठ्यांना त्यांची जागा दाखवली जाते. हे लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही दाखवून दिल्याचे शरद पवारांनी यावेळी म्हटले.
हे वाचलं का?
माझी खात्री आहे लोकसभा निवडणुकीत तुम्ही जे करून दाखवलं, ते आणखीण तीन महिन्यांनी करून दाखवा. राज्य तुमच्या हातात देतो, असे आवाहन शरद पवारांनी बारामतीत शेतकऱ्यांना केले. तसेच सत्तेचा उपयोग तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी केला जाईल, अशी स्थिती निर्माण करायची आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ आम्हाला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे देखील शरद पवारांनी म्हटले आहे.
हे ही वाचा : शरद पवारांचा खासदार अजित पवारांसोबत जाणार, सत्य काय?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT