Pandurang Sakpal: ठाकरेंचा विश्वासू शिवसैनिक हरपला, पांडुरंग सकपाळ यांचं निधन

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : Pandurang Sakpal Death News : देशभरात लोकसभा निवडणूक 2024 ची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) 5 टप्प्यातील मतदान पार पडले असले तरी अंतिम निकालाला अजून 10 दिवस बाकी आहेत. अशात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण ठाकरे गटातील विश्वासू शिवसैनिक पांडुरंग सकपाळ यांचं निधन झालं आहे. शिवसेनेच्या जुन्या नेत्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे. (Shiv Sena UBT Shivsainik Pandurang Sakpal passed away in South Mumbai)

कट्टर शिवसैनिक म्हणून आपलं कर्तव्य पार पाडणारे पांडुरंग सकपाळ दक्षिण मुंबईतील विभागप्रमुख होते. त्यांचे वय जवळपास 61 वर्ष होते, पण गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रूग्णालयात उपचार सुरू होते. पण, आज (25 मे) त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पांडुरंग सकपाळ यांच्यावर आज संध्याकाळी पाच वाजता गिरगाव येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

हेही वाचा : Pune Accident Update : आरोपीच्या आजोबाला ठोकल्या बेड्या; मोठा कट आला समोर
 

पांडुरंग सकपाळ यांची राजकीय कारकीर्द

बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासू साथीदार म्हणून पांडुरंग सकपाळ यांची ओळखले होती. शिवसेनेत फुट पडल्यानंतरसुद्धा   पांडुरंग सपकाळ उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत एकनिष्ठ राहिले. त्यांच्याकडे तब्बल 12 वर्षे दक्षिण मुंबईतील प्रभाग क्रमांक 12 च्या विभाग प्रमुखपदाची जबाबदारी होती. मात्र, 2023 मध्ये उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या तेव्हा त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आले होते. 2019 मध्ये मुंबादेवी मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणूनही पांडुरंग सकपाळ यांनी निवडणूक लढवली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT