Uddhav Thackeray : "...त्यावेळी हुकुमशाहाचा अंत होतो", ठाकरेंचा थेट मोदींवर 'वार'
Uddhav Thackeray Todays Speech : शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या भारत जोडो यात्रेच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे काय बोलले?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
उद्धव ठाकरेंची मोदींसह भाजपवर टीका
भाजप फुगा होता आम्ही हवा भरली, ठाकरेंचा टोला
ठाकरे मोदींना म्हणाले हुकुमशहा
Uddhav Thackeray PM Narendra Modi : भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपप्रसंगी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वार केला. भाजप हा फुगा होता, आम्ही त्याच्यात हवा भरली आणि आता त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, असे म्हणत ठाकरेंनी मोदींना लक्ष्य केले.
उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण
ठाकरे म्हणाले, "भाजप हा एक फुगा आहे. आणि मला वाईट एका गोष्टीचे वाटत की, या फुग्यात हवा भरण्याचे काम आम्हीच केले होते. संपूर्ण देशात यांचे दोन खासदार होते. या फुग्यामध्ये आम्ही हवा भरली आणि त्यांच्या आता डोक्यामध्ये हवा गेली आहे. काय त्यांची स्वप्ने?"
"मला सुद्धा विचारतात की, तुमच्या किती सीट येतील. त्यांना (भाजप) विचारल्यावर ते म्हणतात, ४०० पार. काय फर्निचरचे दुकान आहे का? खुर्च्या बनवताहेत... चारशे पार म्हणजे काय फर्निचरचे दुकान आहे का? पण, ही लढाई... आज देशभरातून महत्त्वाचे नेते इथे आले आहेत."
आम्ही हुकुमशाहाच्या विरोधात -ठाकरे
"ही परिस्थिती फक्त महाराष्ट्रात नाहीये. कश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सारखीच आहे. ज्यावेळी इंडिया आघाडीची बैठक घेतली. त्यावेळी मोदींनी सांगितले होते की ही विरोधी पक्षाची बैठक आहे. आम्ही विरोधी आहोत, पण आम्ही हुकुमशाहाच्या विरोधात आहोत."










