Lok Sabha Elections 2024 : घराणेशाही, राजकीय समीकरणे! 'या' जागा महायुती-मविआसाठी डोकेदुखी का ठरल्यात?

मुंबई तक

Maharashtra Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघा महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी डोके दुखी ठरले आहेत.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघावरून पेच निर्माण झाला आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीत काही मतदारसंघावरून पेच आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

घराणेशाही, शत्रुत्व आणि राजकीय समीकरणे!

point

महाराष्ट्रातील मतदारसंघावरून पेच

point

महायुती आणि महाविकास आघाडीत तिढा

Maharashtra Lok Sabha Elections : महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमुळे दिल्लीतही गोंधळ वाढला आहे. भाजपच्या मुख्यालयात बैठका सुरू आहेत. या बैठकांमध्ये ज्या जागांची घोषणा व्हायची आहे, त्यावर मंथन सुरू आहे. खरंतर, महाराष्ट्रातील चार जागांबाबत पेचप्रसंग आहे. सांगली, माढा आणि सातारा या जागा आहेत. या जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये चुरस सुरू आहे. लोकसभेच्या या जागांवर नावे निश्चित करताना अनेक अडचणी येताहेत. या चार जागा डोकेदुखी का आहेत? हे जाणून घेऊया. 

या जागांमध्ये सांगली मतदारसंघ सर्वात आघाडीवर आहे. जो 1962 ते 2014 पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या संजयकाका पाटील यांनी 2014 मध्ये तो हिसकावून घेतला. 

एवढेच नाही तर 2019 मध्येही संजयकाका पाटील या जागेवरून पुन्हा विजयी झाले. राजकीय निरीक्षक गोपाळ पडळकर यांनी सांगितले की, 2019 च्या निवडणुकीत संजयकाका पाटील यांना 5 लाखांहून अधिक मते मिळाली, तर स्वाभिमानी पक्षाचे विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर यांना प्रत्येकी तीन लाख मते मिळाली.

हेही वाचा >> प्रणिती शिंदेंच्या 'उपऱ्या' टीकेला सातपुतेंचं जोरदार प्रत्युत्तर, शिंदेंचाच काढला इतिहास

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगलीच्या जागेसाठी विशाल पाटील यांच्या नावाची घोषणा करताना विशाल पाटील हे राजकीय वारसा असलेल्या कुटुंबातून आले असून, स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून त्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली जात आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp