बॉलिवूडचा भिडू जॅकी श्रॉफने दाखवला मनाचा मोठेपणा
बॉलिवूडचा भिडू म्हणजेच सगळ्यांचा लाडका जग्गू दादा .जग्गू दादा नेहमीच माणुसकी जपताना दिसतात. ते नेहमीच आपल्यासोबत असणाऱ्या प्रत्येकाची आस्थेने चौकशी करतात,त्यांची विचारपूस करतात,त्यांना लागेल ती मदत करतात. पुन्हा एकदा बॉलिवूडच्या जग्गू दादाने त्याच्या मनाचा मोठेपणा दाखवला आहे. इतर अभिनेते त्यांच्या घरातील काम करणाऱ्या व्यक्तीच्या मनाचा फारसा विचार करताना दिसत नाहीत परंतु, जॅकी यांनी त्यांच्या वागण्याने […]
ADVERTISEMENT

बॉलिवूडचा भिडू म्हणजेच सगळ्यांचा लाडका जग्गू दादा .जग्गू दादा नेहमीच माणुसकी जपताना दिसतात. ते नेहमीच आपल्यासोबत असणाऱ्या प्रत्येकाची आस्थेने चौकशी करतात,त्यांची विचारपूस करतात,त्यांना लागेल ती मदत करतात. पुन्हा एकदा बॉलिवूडच्या जग्गू दादाने त्याच्या मनाचा मोठेपणा दाखवला आहे. इतर अभिनेते त्यांच्या घरातील काम करणाऱ्या व्यक्तीच्या मनाचा फारसा विचार करताना दिसत नाहीत परंतु, जॅकी यांनी त्यांच्या वागण्याने जणू नवा पायंडा पडला आहे. त्यांच्या घरात घरकाम करणाऱ्या मुलीच्या कुटुंबातील एका सदस्याचं निधन झाल्याची त्यांना बातमी समजताच त्यांनी थेट तिच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
त्यांच्या घरात घरकाम करणाऱ्या दीपाली तुपेच्या आजीचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. ही बातमी समजताच जॅकी तिच्या घरी म्हणजे पुणे जिल्ह्यातील मावळमधील पवनानगर येथे पोहोचले. वयाची शंभरी ओलांडलेली दिपालीची आजी म्हणजे तान्हाबाई ठाकर यांच्या निधनाची वार्ता समजताच जॅकी स्वतः तिच्या आजीच्या घरी गेले आणि त्यांनी दिपालीच्या कुटुंबाचं सांत्वन केलं. . ते नेहमीच त्याच्यातील माणुसकी जपताना दिसतात. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं याचा प्रत्यय त्यांच्या चाहत्यांना अनेकदा आला आहे. जॅकी यांनी अत्यंत हलाखीच्या दिवसांचा सामना केला आहे. आज त्यांना मिळालेलं यश हे प्रचंड अडचणींवर मात करून मिळालं आहे. त्यांचं बालपण एका मध्यमवर्गीय कुटुंबात गेलं. लहानपणी चाळीत राहिल्याने त्यांना इतरांच्या परिस्थितीची जाण आहे.