‘प्रायव्हेट पार्ट दाखवून 0 ते 10 रेटिंग द्यायला सांगायचा’; साजिद खानवर शर्लिन चोप्रानं केले पुन्हा गंभीर आरोप
दिग्दर्शक साजिद खान हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नुकताच तो बिग बॉस सिझल 16 मध्ये प्रतिस्पर्धी म्हणून सहभागी झाला आहे. त्याला बिग बॉसमध्ये पाहून अनेकजण संतापले आहेत. त्याला पाहून काहीजण नाखूष आहेत. साजिदचं नाव यापूर्वी मीटू प्रकरणात आलं होतं. त्यामुळे दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून साजिद खानला बिग बॉसमधून […]
ADVERTISEMENT

दिग्दर्शक साजिद खान हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नुकताच तो बिग बॉस सिझल 16 मध्ये प्रतिस्पर्धी म्हणून सहभागी झाला आहे. त्याला बिग बॉसमध्ये पाहून अनेकजण संतापले आहेत. त्याला पाहून काहीजण नाखूष आहेत. साजिदचं नाव यापूर्वी मीटू प्रकरणात आलं होतं. त्यामुळे दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून साजिद खानला बिग बॉसमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे. त्यात आता अभिनेत्री शर्लिनने पुन्हा एकदा साजिदवर निशाणा साधला आहे. म्हणून साजिदच्या नावाची चर्चा होत आहे. साजिदने आपल्यासोबत विनयभंग केलाय त्यामुळे मला बिग बॉसच्या घरात जाऊ द्या, असं आवाहन तिने केलं आहे.
नेमकं काय म्हणाली शर्लिन
अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने ट्विटच्या माध्यमाने साजिदवर गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली साजिदने मला एकदा आपला प्रायव्हेट पार्ट दाखवून 0 ते 10 मध्ये रेटिंग दे, अशी विचारणा केली होती. असा गंभीर आरोप शर्लिन चोप्रानं केलं आहे. त्यामुळं आता मला बिग बॉसच्या घरात जाऊन त्याला रेटिंग द्यायची आहे, असा संताप तिने व्यक्त केलाय. विनयभंग करणाऱ्या व्यक्तीबरोबर पीडित महिला कसा व्यवहार करते, हेदेखील देशाला बघू दे. सलमान खानने यावर स्टॅन्ड घ्यायला हवा, असं म्हणत तिने आपल्या पोस्टमध्ये सलमानला टॅग केलं आहे. आता यावर बिग बॉसकडून काय पावले उचलली जातात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
साजिदवर #MeToo प्रकरणात अनेक आरोप
जेव्हापासून साजिद खान वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस 16 मध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जाऊ लागलं , तेव्हापासून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. कारण साजिद खानवर #MeToo अंतर्गत गेल्या दोन-तीन वर्षांपासून अनेक गंभीर आरोप होत आहेत. साजिदवर आपल्या पदाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप करण्यासाठी अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सनी पुढे येऊन त्याच्याविरोधात आवाज उठवला होता. हे प्रकरण इतके वाढले होते की साजिदला त्याच्या ‘हाऊसफुल 4’ चित्रपटातून त्याचे नाव वगळावे लागले.