KRK arrest : इरफान खान-ऋषी कपूर यांच्याविरोधात ट्विट करणं भोवलं, कमाल खानला अटक
अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खानला (KRK) अटक करण्यात आली आहे. केआरके याला मुंबईतील मालाड पोलिसांनी अटक केली. मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दोन वर्षांपूर्वीच्या ट्विट प्रकरणी पोलिसांनी विमानतळावर अटकेची कारवाई केली. अभिनेता कमाल आर खान याने दोन वर्षांपूर्वी एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटवर आक्षेप घेत मालाड पोलीस ठाण्यात केआरके विरुद्ध […]
ADVERTISEMENT

अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खानला (KRK) अटक करण्यात आली आहे. केआरके याला मुंबईतील मालाड पोलिसांनी अटक केली. मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दोन वर्षांपूर्वीच्या ट्विट प्रकरणी पोलिसांनी विमानतळावर अटकेची कारवाई केली.
अभिनेता कमाल आर खान याने दोन वर्षांपूर्वी एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटवर आक्षेप घेत मालाड पोलीस ठाण्यात केआरके विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या ट्विट प्रकरणी आज अटक करण्यात आली आहे.
केआरके (KRK) ला अटक का करण्यात आलीये?
कमाल आर खानला २०२० मध्ये केलेल्या ट्विट प्रकरणात अटक करण्यात आलीये. कमाल आर खानने २०२० मध्ये अभिनेता इरफान खान आणि ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केले होते. कमाल आर खानच्या दोन्ही ट्विटवर राहुल कनाल यांनी आक्षेप घेतला होता आणि तक्रार दिली होती. मालाड पोलिसांनी कमाल आर खानला विमानतळावर ताब्यात घेतलं होतं. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी केआरकेला अटक केली.
कमाल आर खान यांच्याविरुद्ध २०२० मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. केआरकेवर आरोप आहे की त्याने सोशल मीडियावर धर्माबद्दल वादग्रस्त ट्विट केलं. केआरके विरुद्ध युवा सेनेचे सदस्य राहुल कनाल यांनी तक्रार दिली होती.










