बॉलिवूडमध्ये खळबळ! कतरिना कैफ, विकी कौशलला जिवे मारण्याची धमकी

Katrina Kaif and Vicky Kaushal gets death threat : अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियातून विकी कौशल आणि कतरिना कैफ दिली धमकी
death threats to Katrina Kaif and Vicky Kaushal
death threats to Katrina Kaif and Vicky Kaushal

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल असलेल्या अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्याबद्दल एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने विकी आणि कतरिनाला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे.

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफला धमकी मिळाल्याच्या माहितीला मुंबई पोलिसांनी दुजोरा दिला आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफला अज्ञात व्यक्तीने इन्स्टाग्रामवरून जिवे मारण्याची धमकी दिली. धमकी देणारी व्यक्ती कोण आहे, याबद्दल अद्याप माहिती कळू शकलेली नाही.

इन्स्टाग्रामवरुन कतरिना कैफलाही धमकी

अभिनेता विकी कौशलने यासंदर्भात सांताक्रुझ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. विकी कौशलने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार एका व्यक्तीने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिलीये. अज्ञात व्यक्तीने इन्स्टाग्रामवरही पोस्ट शेअर केली आहे.

धमकी देणारा आरोपी कतरिना कैफवर सोशल मीडियाच्या माध्यमातून नजर ठेवत असून, कतरिनालाही धमकी देत आहे, असं विकी कौशलने पोलिसांना सांगितलं.

विकी-कतरिनाला धमकी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

विकी कौशलने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

एकमेकांना डेट केल्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफ गेल्या वर्षी विवाह बंधनात अडकले. दोघांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानातील सवाई मधोपूर जिल्ह्यात असलेल्या सिक्स सेन्सेस फोर्ट या हॉटेलमध्ये लग्न केलं.

लग्नानंतर कतरिना कैफ आणि विकी कौशल आपापल्या कामात बिझी झाले. कतरिना कैफ टायगर ३ या चित्रपटात पुन्हा एकदा सलमान खानसोबत दिसणार आहे. कतरिना कैफचा इशान खट्टरसोबत फोन भूत हा चित्रपट येणार आहे. त्याचबरोबर सिद्धांत चतुर्वेदी, विजय सेतुपती यांच्यासोबत मेरी ख्रिसमस आणि जी ले जरा मध्ये आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रासोबत कतरिना कैफ दिसणार आहे.

विकी कौशलचेही काही चित्रपट पुढील काळात येणार आहेत. यात सारा अली खानसोबत 'विजन रॉम कॉम', मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादूर' यांचा समावेश आहे. सॅम बहादूरमध्ये विकी कौशलसोबत सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख दिसणार आहे. त्याचबरोबर गोविंदा नाम मेरा चित्रपटात विकी कौशल भूमी पेडणेकर आणि कियारा आडवाणीसोबत दिसणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in