Mimi chakraborty : 'रणवीर सिंग ऐवजी महिला असती तर कौतुक केलं असतं की, घर जाळलं असतं?'

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटला दाद देणाऱ्यांना मिमी चक्रवर्तीचा जळजळीत सवाल
Mimi Chakraborty on ranveer singh nude photoshoot
Mimi Chakraborty on ranveer singh nude photoshoot

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने केलेलं न्यूड फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चांगलंच गाजतंय. एकीकडे रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर लाईक्सचा पाऊस पडतोय, तर दुसरीकडे मीम्सही व्हायरल होताहेत. रणवीरच्या याच न्यूड फोटोशूटवरून अभिनेत्री मिमी चक्रवर्तीने सर्वांना एक सवाल केलाय.

अभिनेता रणवीर सिंगने पेपर मॅगझीनसाठी फोटोशूट केलंय. एरवी चित्रविचित्र वेशभूषा करून फोटोशूट करणाारा रणवीर सिंग या फोटोत विवस्त्र होऊन पोझ देताना दिसला. रणवीर सिंगचं हेच फोटोशूट आता सोशल मीडियावर धुमाकूळ घातलंय.

रणवीर सिंगच्या या फोटोशूटचं कौतुक होत असताना आता बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्तीने जळजळीत सवाल केलाय. रणवीर सिंगऐवजी एखाद्या महिलेनं जर असं फोटोशूट केलं असतं, तर काय केलं असतं? असा सवाल तिने रणवीर सिंगच्या फोटोशूटचं कौतुक करणाऱ्यांना केलाय.

Mimi Chakraborty on ranveer singh nude photoshoot
'कपड्यावर जीएसटी लागल्यानंतर रणवीर सिंग'; अभिनेत्याच्या न्यूड फोटोशूटवरून मीम्सचा पूर

मिमी चक्रवर्तीने रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर काय म्हटलंय?

बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्तीने ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये मिमी चक्रवर्ती म्हणते, "रणवीर सिंगने अलिकडेच केलेल्या फोटोशूटने इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय आणि जास्तीत जास्त कमेंट फायर (आगीचा इमोजी) च्या आहेत. मी विचार करतेय की, जर यात एखादी महिला असती, तर काय झालं असतं? महिला असती, तर असंच कौतुक झालं असतं का? की तुम्ही तिचं घर जाळलं असतं? मोर्चा काढला असता, तिला जिवे मारण्याची धमकी दिली असती आणि स्लट शेमिंग केली असती?"

याच ट्विटमध्ये मिमी चक्रवर्ती म्हणते, "समानतेच्या गप्पा मारणार आता कुठे आहेत? तुम्हाला माहितीये का की, तुमची बघण्याची दृष्टीच हे बदलू शकते किंवा उद्ध्वस्त करू शकते. अशा गोष्टीत आपल्या विचारांच्या कक्षा थोड्या वाढवायला हव्यात, कारण अशी देहयष्टी खूप कष्टानंतर मिळते. विश्वास ठेवा. (मीठ, साखर, कार्बोदकं सगळं सोडावं लागतं)," अशा शब्दात मिमी चक्रवर्तीने सुनावलं आहे.

पेपर मॅगझीनसाठी रणवीर सिंगचं न्यूड फोटोशूट

अभिनेता रणवीर सिंगने पेपर मॅगझीनसाठी न्यूड फोटोशूट केलं असून, त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोशूटसाठी रणवीर सिंगचं कौतुक होतं आहे. या फोटोशूटबद्दल बोलताना रणवीर सिंग म्हणाला की, मी हजारो लोकांसमोरही नग्न उभा राहू शकतो. मला काही फरक पडत नाही."

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in