Haddi : कानात झुमके, हातात बांगड्या... नवाजुद्धीन सिद्दीकीचा लुक पाहून चाहतेही अवाक्

nawazuddin siddiqui transgender look in haddi : हड्डी चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी ट्रान्सजेंडर्सची भूमिकेत आहे...
नवाजुद्दीन सिद्दीकीचा हड्डी चित्रपटातील लुक
नवाजुद्दीन सिद्दीकीचा हड्डी चित्रपटातील लुकPhotos - Zee Studio

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाच्या चर्चा नेहमीच होत असतात. नवाजुद्दीन सिद्दीकीने ज्या भूमिका साकारल्यात त्यांनी चाहत्यांची मनं जिंकलीत. त्यात आता नवाजुद्दीन सिद्दीकी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. हड्डी चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी अगदी वेगळ्या भूमिकेत असून, सिनेमातील त्याचा लुक बघून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी वेगळ्या धाटणीच्या भूमिकेत असून, या फर्स्ट लुक समोर आल्यानंतर सगळेच अवाक् झाले होते. नवाजुद्दीन सिद्दीकीने आता ट्रान्सजेंडर्ससोबत काम करताना अनुभव सांगितलाय.

नवाजुद्दीन सिद्दीकीची हड्डी चित्रपटातील भूमिका

हड्डी चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने 80 खऱ्या ट्रान्सजेंडर्ससोबत काम केलंय. ट्रान्सजेंडर्ससोबत काम करायला मिळणं, हा सन्मानच होता, असं नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला.

"हड्डी चित्रपटात खऱ्या ट्रान्सजेंडर्ससोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. माझ्यासाठी ही सन्मानाची गोष्ट आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं मला ट्रान्स समुदायाबद्दल समजून घेता आलं आणि शिकायला मिळालं", असं नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला.

हड्डी चित्रपटातल्या नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भूमिकेचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आल्यानंतर नवाजुद्दीनच्या चाहत्यांसह सगळ्यांनाच धक्का बसला होता. ग्रे कलरचा शिमरी गाऊन आणि बोल्ड मेकअपमधील नवाजुद्दीन सिद्दीकीच्या लुकचं कौतुक झालं होतं. कारण या लुकमध्ये नवाजुद्दीनला ओळखणं अवघड झालं होतं.

हड्डीतला नवाजुद्दीन सिद्दीकीचा आणखी एक लुक समोर

हड्डी चित्रपटातील नवाजुद्दीन सिद्दीकीच्या लुकचा आणखी एक फोटो शेअर करण्यात आलाय. यावेळी नवाजुद्दीन सिद्दीकीने साडी नेसलेली आहे. तो पारंपरिक वेशभूषेत दिसत आहे. नव्या लुकमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने हिरव्या रंगाची साडी नेसलेली आहे. त्याचबरोबर कपाळावर लाल रंगाची मोठी टिकली असून, डार्क शेडची लिपस्टिक आणि केस मोकळे सोडलेले आहेत.

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या लुकवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाही येत आहे. एका यूजरने म्हटलंय की, सुरूवातीला मला रवीना टंडन आहे, असं वाटलं. तर दुसऱ्या एकाने यूजरने नवाजुद्दीनच्या स्ट्रगलबद्दल प्रतिक्रिया दिलीये.

खूप मेहनत केल्यानंतर तुम्ही इतक्या वर आला आहात. मी तुम्हाला मुन्नाभाईमध्ये बघितलेलं आहे, असं या यूजरने म्हटलंय. एकवेळ असं वाटलं की नवाजुद्दीन सिद्दीकी नाही, पण थोडं लक्ष देऊन बघितल्यानंतर कळलं, असंही एका यूजरने म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in