Nude Photoshoot : रणवीर सिंगची दोन तास चौकशी; मुंबई पोलिसांच्या प्रश्नावर म्हणाला, माहिती असतं, तर…
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग न्यूड फोटोशूटमुळे सतत चर्चेत असतो. रणवीरच्या या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. न्यूड फोटोंबाबत रणवीरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणी रणवीरने आपलं म्हणणं नोंदवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर सिंग मुंबई पोलिसांना त्याच्या न्यूड फोटोंबाबत स्टेटमेंट देताना खूप शांत राहिला. रणवीरने सोमवारी सकाळी ७ ते ९ या […]
ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग न्यूड फोटोशूटमुळे सतत चर्चेत असतो. रणवीरच्या या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. न्यूड फोटोंबाबत रणवीरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणी रणवीरने आपलं म्हणणं नोंदवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर सिंग मुंबई पोलिसांना त्याच्या न्यूड फोटोंबाबत स्टेटमेंट देताना खूप शांत राहिला. रणवीरने सोमवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात हजर राहून त्याचे जबाब नोंदवले आणि पोलिसांना आपले स्पष्टीकरण दिले.
रणवीर वादावर का गप्प बसला?
जेव्हापासून रणवीर सिंगच्या नग्न छायाचित्रांवरून वाद सुरू झाला, तेव्हापासून तो त्याच्या कायदेशीर टीमच्या सांगण्यावरून गप्प बसला होता, असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रणवीरच्या वकिलाने त्याला या प्रकरणी फक्त पोलिसांसमोरच आपले म्हणणे मांडावे, बाकी मीडियाशी याबद्दल बोलू नये, असा सल्ला दिला होता. सूत्राने सांगितले की, चौकशीदरम्यान रणवीर सिंग खूप शांत राहिला.
रणवीर पोलिसांना काय म्हणाला?