Aishwarya rai: "मी आणि ऐश्वर्या घटस्फोट घेत आहोत", अभिषेकच्या व्हायरल व्हिडीओने खळबळ
Aishwarya rai abhishek bachchan divorce Viral Video : गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय यांच्या घटस्फोटाची चर्चा होत आहे. त्यातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अभिषेक बच्चन-ऐश्वर्या रॉयच्या घटस्फोटाची चर्चा
अभिषेक बच्चनचा एक व्हिडीओ व्हायरल
अभिषेक बच्चन खरंच घटस्फोटाबद्दल बोलला का?
Abhishek Bachchan Aishwarya Rai : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हे जोडपे घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. दोघांच्या नात्यात दुरावा आला असल्याचे गॉसिप सुरू आहे. त्यातच आता अभिषेक बच्चनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Abhishek bachchan video went viral while discussion of divorce)
ADVERTISEMENT
बॉलिवूड कपल ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन यांच्यात अलबेल नसल्याच्या चर्चा जोरात सुरू आहे. त्याला हवा मिळाली ती अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नातील बच्चन कुटुंबीयांच्या उपस्थितीमुळे.
अभिषेक बच्चनच्या व्हायरल व्हिडीओमध्ये काय?
ब्लॅक अॅण्ड व्हाईट असलेला अभिषेकचा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे. यात अभिषेक बच्चन म्हणतो की, 'मी आणि ऐश्वर्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.' यात अभिषेक मुलगी आराध्याचाही उल्लेख करतो.
हे वाचलं का?
हेही वाचा >> ''शरद पवारांसारखा 83 वर्षांचा माणूस...'', राज ठाकरे काय बोलून गेले?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओ अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. तर काहींनी हा व्हिडीओ खरा आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. तुम्ही हा व्हिडीओ बघितला तर तुम्हालाही हा प्रश्न पडेल.
हेही वाचा >> म्हाडाचा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे 'ही' कागदपत्रे हवीच!
अभिषेक बच्चनचा व्हिडीओ खरा की खोटा?
तुम्हाला हा व्हिडीओ खरा वाटत असेल, तर जरा थांबा. हा व्हिडीओ नीट बघितला तर लक्षात येतं की तो डीप फेक व्हिडीओ आहे. एआय म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने हा व्हिडीओ बनल्याचे दिसत आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> ''माझ्या नादी लागू नका, नाहीतर...'', ठाकरे, पवारांना राज ठाकरेंचा इशारा
या व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चन बोलतो त्यावेळी शब्द जुळत नाही. याला इंग्रजीमध्ये लिप सिंकिंग सिंक आऊट असंही म्हणतात. त्यामुळे हा व्हिडीओ छेडछाड केलेला असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
ADVERTISEMENT
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात काय घडलेलं?
संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या लग्नाला बच्चन कुटुंबीयांनीही हजेरी लावत वधू-वराला आशीर्वाद दिले होते. पण, बच्चन कुटुंब एकत्र दिसले नाही. ऐश्वर्या रॉय ही मुलगी आराध्या सोबत आली होती. तर अमिताभ बच्चन, जया बच्चन हे मुलगी आणि कुटुंबातील इतरांसोबत आले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT