Aishwarya Abhishek Divorce Rumour : ऐश्वर्या-अभिषेक झाले एकत्र स्पॉट, घटस्फोटाच्या चर्चांना मिळणार पुर्णविराम?
Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce Rumour : खरं तर घटस्फोटाची चर्चा सुरु झाल्यापासून ऐश्वर्या अभिषेक एकत्र स्पॉट झालेच नव्हते.अंबानी कुटुंबियांच्या लग्न सोहळ्यातही अभिषेक कुटुंबियांसोबत वेगळा स्पॉट झाला होता तर ऐश्वर्या आणि आराध्या वेगळ्या स्पॉट झाल्या होत्या. इतकंच नाही तर वेकेशनवर देखील ऐश्वर्या आणि आराध्या एकत्रच गेल्या होत्या. या दोन्ही प्रसंगी ऐश्वर्या आणि अभिषेक वेगवेगळे होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ऐश्वर्या अभिषेक झाले एकत्र स्पॉट

दुबईच्या एअरपोर्टवर कॅमेरात झाले कैद

ऐश्वर्या अभिषेक एकत्र प्रवास करताना व्हिडिओ व्हायरल
Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce Rumour : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या लग्नाला 17 वर्ष पुर्ण झाली आहेत. लग्नाच्या इतक्या वर्षानंतर दोघेही घटस्फोट घेणार असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये सुरु आहे. पण या घटस्फोटाच्या चर्चेवर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबीयांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आहे. त्यात आता या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान मोठी अपडेट समोर आली आहे. यामुळे घटस्फोटाच्या पुर्णविराम लागणार असल्याची चर्चा सुरु आहे. (aishwarya rai bachchan abhishek bachchan divorce rumour new video viral aishwarya and abhishek spotted together)
खरं तर घटस्फोटाची चर्चा सुरु झाल्यापासून ऐश्वर्या अभिषेक एकत्र स्पॉट झालेच नव्हते.अंबानी कुटुंबियांच्या लग्न सोहळ्यातही अभिषेक कुटुंबियांसोबत वेगळा स्पॉट झाला होता तर ऐश्वर्या आणि आराध्या वेगळ्या स्पॉट झाल्या होत्या. इतकंच नाही तर वेकेशनवर देखील ऐश्वर्या आणि आराध्या एकत्रच गेल्या होत्या. या दोन्ही प्रसंगी ऐश्वर्या आणि अभिषेक वेगवेगळे होते. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र या चर्चे दरम्यान आता ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र स्पॉट झाले आहेत. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
हे ही वाचा : Pune Crime: बहिणीचं मुंडकं छाटलं, भाऊ-वहिनीने अशी केली हत्या की, अवघं पुणं हादरलं!
व्हिडिओत काय?
घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान अभिषेक आणि ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत दिसले आहेत. त्यांचा व्हिडिओ एका फॅन फेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर दुबई एअरपोर्ट असं लिहलंय. त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चा निव्वळ अफवा असून दोघे अजूनही सोबत असल्याची चर्चा सुरू आहे.
इस्टाग्रामवर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो एका एअरपोर्टवरील असल्याची माहिती आहे. या व्हिडिओत विमानातून उतरल्यानंतर अभिषेक बसच्या दिशेने जाताना दिसतोय. आणि त्यांच्या मागे ऐश्वर्या आणि आराध्या एकत्र येताना दिसतात आणि बसमध्ये चढताना दिसतात. त्यामुळे दोघांमध्ये सारं काही आलबेल असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण हा व्हिडिओ आताच नाही आहे. तो फ्रेब्रुवारी दरम्यानचा असल्याची माहिती समोर आली आहे.