Bigg Boss OTT 3 Winner : सना मकबूलने पटकावली ट्रॉफी; किती मिळणार पैसे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

अभिनेत्री सना मकबूलने बिग बॉस ओटीटी ३ ची ट्रॉफी जिंकली.
बिग बॉस ओटीटी ३ विजेता सना मकबूल.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बिग बॉस ओटीटी ३ विजेता

point

सना मकबूल ठरली विजेता

point

बिग बॉस ओटीटी ३ ची ट्रॉफीवर सनाने कोरलं नाव

Sana Makbul Latest News : दीड महिना हायव्होल्टेज ड्रामा घडल्यानंतर बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या हंगामाचा विजेता मिळाला. टीव्ही अभिनेत्री सना मकबूल बिग बॉस ओटीटीची विजेता ठरली. रॅपर नॅजी पहिला आणि रणवीर शौरी दुसरा रनरअप ठरला. (Winner of Big Boss OTT 3 Sana Makbul)

बिग बॉस ओटीटी 3 चा ग्रँड फिनाले शुक्रवारी (2 ऑगस्ट) पार पडला. मॉडल आणि अभिनेत्री सना मकबूलने रॅपर नॅजीला पराभूत करत ट्रॉफी जिंकली. सना मकबूलला 25 लाख रुपये मिळाले. 

सना मकबूल झाली भावूक

अनिल कपूर होस्ट करत असलेल्या हा शो भांडणांमुळे दीड महिना चर्चेत राहिला. बिग बॉस ओटीटीचे विजेतेपद जिंकण्याचे सना मकबूलचे पहिल्या दिवसापासून स्वप्न होते. अनिल कपूरने विजेता म्हणून सनाच्या नाव जाहीर केल्यानंतर ती भावूक झाली. तिचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आई, बहीण आणि बॉयफ्रेंड

बिग बॉस ओटीटी 3 ची विजेता ठरल्यानंतर सना मकबूलने आईला घट्ट मिठी मारली. सना मकबूलची बहीण आणि तिचा कथित बॉयफ्रेंड श्रीकांत बुरेड्डी पण बिग बॉस ओटीटीच्या फिनालेला हजर होते. 

सगळ्यांना उत्तर दिलंय; ट्रॉफी जिंकल्यानंतर सनाची प्रतिक्रिया

बिग बॉस ओटीटी विजेता ठरल्यानंतर 'इंडिया टुडे'शी बोलताना सना मकबूलने तिच्या भावना व्यक्त केल्या. 

ADVERTISEMENT

"शो मध्ये पहिल्या दिवसापासून ट्रॉफी जिंकायची इच्छा होती. तोच प्रयत्न सातत्याने करत होते. आज मी ट्रॉफी जिंकली आहे आणि मी सगळ्यांचे आभारी आहे. माझ्या मनात स्वतःबद्दलचा आदर आणखी वाढला आहे. घरात प्रत्येक जण माझ्यावर टिका टिप्पणी करत होते, पण आज मी ट्रॉफी जिंकून त्या सगळ्यांना उत्तर दिलं आहे", असे सना मकबूल म्हणाली. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT