अरे बापरे... Ekta Kapoor विरुद्ध Pocso चा गुन्हा, तिची आईही... नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

एकता कपूरच्या अडचणी वाढल्या (Milind Shelte / India Today)
एकता कपूरच्या अडचणी वाढल्या (Milind Shelte / India Today)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

Ekta Kapoor विरुद्ध Pocso अंतर्गत गुन्हा दाखल!

point

नेमकं प्रकरण काय?

point

एकता कपूरच्या अडचणी वाढणार?

Pocso On Ekta Kapoor and her Mother : सुप्रसिद्ध निर्माती एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म 'अल्ट बालाजी'च्या 'गंदी बात' या वेब सीरिजमध्ये अल्पवयीन मुलींशी संबंधित अश्लील दृश्य दाखवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यामुळे एकता कपूर आणि 'अल्ट बालाजी' या कंपनीच्या कामकाजावर आता गंभीर परिणाम होऊ शकतो. (Case filed under Pocso against Ekta Kapoor along with her mother What exactly happenend)

नेमकं प्रकरण काय?

एकता कपूर टीव्ही इंडस्ट्रीची क्वीन मानली जाते. एकतासह तिच्या आईवर आता पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे. नेमकं काय घडलं? जाणून घेऊया. तक्रारदाराने दाखल केलेल्या पत्रात असा आरोप केला आहे की, आधी या वेब सीरिजमध्ये सिगारेटचा वापर करत महापुरूषांचा आणि संतांचा अपमान करण्याच आला होता.

हेही वाचा : Sushma Andhare: "शहाजीबापूंना फोन करणारा हाच तो", कारमध्ये 5 कोटी सापडल्यानंतर सुषमा अंधारेंचं ट्वीट व्हायरल

यानंतर सीरिजमध्ये पॉक्सोच्या नियमांचे उल्लंघन करत काही दृश्ये दाखवण्यात आली आहेत. यामध्ये माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, वुमन प्रोहिबिशन अॅक्ट 1986 आणि सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने अधिनियम 2003 यांसारख्या कायद्यांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले आहे. गुन्हा दाखल करणाऱ्या तक्रारदाराने यामध्ये बालकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या कायद्यांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट केले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एकता कपूरच्या अडचणी वाढणार?

'गंदी बात' वेब सीरिज भारतातील सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या वेब सीरिजपैकी एक आहे. पण यामधील काही सीन आता वादग्रस्त ठरत आहेत. 

करिअरच्या सुरुवातीला एकताला काही अपयशांचा सामना करावा लागला पण नंतर तिने हिंदी मालिकांमध्ये नशीब आजमावलं आणि ती हीट ठरली. पण, नवीन काही दाखवण्याच्या नादात सध्या एकताने निर्मिती केलेल्या सीरिजमध्ये सामान्य पात्र अश्लीलतेची मर्यादा ओलांडताना दिसली. याच कारणामुळे 2020 मध्ये मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर अल्ट बालाजीच्या XXX वेब सीरिजवर लष्कराच्या जवानांचा अपमान केल्याचा तिच्यावर आरोप करण्यात आला.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Rupali Thombare:"बाई काय हा प्रकार...तोच तो डर्टी पिक्चर", रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर?

एकता कपूरने लहान वयातच इंडस्ट्रीत प्रवेश केला. जाहिरात आणि फीचर फिल्म निर्माते कैलाश सुरेंद्रनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी इंटर्नशिप केली. लवकरच तिने तिचे अभिनेते वडील जितेंद्र यांच्याकडून आर्थिक मदत घेतली आणि बालाजी टेलिफिल्म्सच्या बॅनरखाली निर्माती बनली. त्याचे सुरुवातीचे प्रकल्प अयशस्वी झाले, 6 पायलट भाग नाकारले गेले. त्यानंतर 'हम पांच' या कॉमेडी शोने त्याला यशाची चव चाखली. एकताला फक्त 'क्योंकी सास भी कभी बहू थी' आणि 'कहानी घर घर की' मधून यश मिळाले नाही तर हे दोन शो होते ज्यांनी हिंदी टेलिव्हिजनची दिशा बदलली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT