विक्रम गोखलेंची प्रकृती पुन्हा एकदा खालावली : डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या तब्येतीबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे. काल गोखले यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा दिसून आली होती. मात्र शनिवारी पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावली आहे. तसंच त्यांना पुन्हा रक्तदाबाची औषध सुरु करण्यात आली आहेत. ते अद्यापही व्हेंटिलेटरवर आहेत. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगिकर यांनी सकाळी मेडिकल बुलेटिन जारी करुन […]
ADVERTISEMENT

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या तब्येतीबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे. काल गोखले यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा दिसून आली होती. मात्र शनिवारी पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावली आहे. तसंच त्यांना पुन्हा रक्तदाबाची औषध सुरु करण्यात आली आहेत. ते अद्यापही व्हेंटिलेटरवर आहेत. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगिकर यांनी सकाळी मेडिकल बुलेटिन जारी करुन ही माहिती दिली. उद्या सकाळी ११ वाजता पुढचे बुलेटिन जारी केले जाईल, असंही शिरीष याडगिकर यांनी सांगितलं.
काल जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये विक्रम गोखलेंची तब्येत हळूहळू सुधारत असल्याचं सांगण्यात आलं होतं. ते आता डोळे उघडत असून हातपाय देखील हलवत आहेत. त्यांचं ब्लड प्रेशर आणि हार्ट स्टेबल आहे. यासह पुढील 48 तासात व्हेंटिलेटर देखील काढलं जाऊ शकतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली होती. त्यामुळे कुटुंबियांसह त्यांच्या चाहत्यांसाठी दिलासा मिळाला होता.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावल्यामुळे बुधवारी त्यांना पुण्यातली दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं देखील बोललं जात होतं. गेल्या चोवीस तासात ते उपचारांना प्रतिसाद देत नाहीत. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत अशी महत्त्वाची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचे डॉक्टर शिरीष याडगिकर यांनी गुरुवारी दिली होती.
मात्र, शुक्रवारी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार किंचित का होईना त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. तसंच ते डोळे उघडत असून हातपाय देखील हलवत असल्याची महत्वाची सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज पुन्हा त्यांची तब्येत खालावली असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.