थलायवीचे कौतुक न केल्याबद्दल कंगना राणौतने बॉलिवूडवर चढवला हल्ला, म्हणाली...

Kangana Ranaut attacks Bollywood : कंगनाने थलायवी रिलीज झाल्यावर पुन्हा एकदा सोशल मिडियावरून बॉलिवूडवर हल्ला चढवला आहे
थलायवीचे कौतुक न केल्याबद्दल कंगना राणौतने बॉलिवूडवर चढवला हल्ला, म्हणाली...

कंगना राणौतची प्रमुख भूमिका असलेला थलायवी हा सिनेमा १० सप्टेंबरला रिलीज झाला.. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित असलेला थलायवी हा बायोपिक आहे. ज्यात जयललिता यांची भूमिका कंगना राणौतने साकारली आहे. मात्र थलायवी रिलीज झाल्यानंतर सिनेमाला मिळालेला थंड रिस्पॉन्स आणि समीक्षकांनी केलेल्या टीकेमुळे कंगना राणौत चांगलीच नाराज झाली आहे. तिने सोशल मिडीयावर पोस्ट करत पुन्हा एकदा बॉलिवूडला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत..

कंगनाने म्हटलं आहे की थलायवीसाठी आमच्या टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. जयललितांसारख्या मोठ्या व्यक्तीमत्वावर सिनेमा बनवताना आमच्या टीमने खूप रिसर्च आणि मेहनत घेतली आहे. आणि त्यामुळेच इतका सुंदर सिनेमा आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकलो. मात्र बॉलिवूडमधल्या माफिया गटाला आमचं हे चांगलं प्रॉडक्ट पाहवत नाही. तसंच काही समीक्षकांनीही बॉलिवूड माफियांच्या शब्दांत येऊन आमच्या सिनेमावर टीका केली आहे. त्यामुळे आपल्या विचारांचा स्तर आता उंचवावा.. माझ्या आणि तुमच्या विचारांत मतभेद असतील मात्र सिनेमासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. मग तो कोणताही सिनेमा असो तो सिनेमा चांगला चालण्यासाठी बॉलिवूडमधल्या सगळ्यांनीच एकत्र येण्याची गरज आहे. मात्र बॉलिवूड माफियांना ते मान्य नाही त्यामुळे त्यांनी स्वतचे विचार बदलून ,चांगला आणि मोठा विचार करण्याची नितांत गरज आहे.

Related Stories

No stories found.