करीना कपूर झाली पुणे पोलिसांची फॅन, इंस्टा पोस्ट शेअर करत म्हणाली…..
कोरोनाने मुंबईसह, महाराष्ट्रात, देशात पुन्हा हात-पाय पसरण्यास सुरूवात केली. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सरकार आणि प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी मास्क लावावे, गर्दी टाळावी, सोशल डिस्टन्सिंग या सगळ्या गोष्टी पाळण्याचं आवाहन केलं जातं आहे. अशात पुणे पोलिसांनी लोकांना मास्क घालण्यासंदर्भात आणि कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी एक खास व्हीडिओ शेअर केला आहे. […]
ADVERTISEMENT

कोरोनाने मुंबईसह, महाराष्ट्रात, देशात पुन्हा हात-पाय पसरण्यास सुरूवात केली. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सरकार आणि प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी मास्क लावावे, गर्दी टाळावी, सोशल डिस्टन्सिंग या सगळ्या गोष्टी पाळण्याचं आवाहन केलं जातं आहे. अशात पुणे पोलिसांनी लोकांना मास्क घालण्यासंदर्भात आणि कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी एक खास व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओचं कौतुक अभिनेत्री करीना कपूरने केलं आहे.
Brilliant video असं म्हणत पुणे पोलिसांच्या या व्हीडिओचं कौतुक केलं आहे. पुणे पोलिसांनी राज कपूर यांच्या मेरा नाम जोकर या सिनेमातील ए भाय जरा देख के चलो.. या गाण्याच्या चालीवर एक गाणं तयार करून मास्क घालणं, कोरोनासंबंधीचे नियम पाळणं याविषयी जनजागृती केली आहे. या उपक्रमाचं, या गाण्याचं करीना कपूरने कौतुक केलं आहे. ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पोलिसांचं मनोधैर्य वाढवल्याबद्दल धन्यवाद असं म्हणत करीनाचे आभार मानले आहेत.
Brilliant video असं म्हणत करीनाने या पुणे पोलिसांच्या उपक्रमाचं कौतुक केलं आहे. तसंच #Rajkapoor हा हॅशटॅगही ट्रेंड केला आहे. करीना कपूर ही शो मन राज कपूर यांची नात आहे. कपूर घराण्याच्या चार पिढ्या सिनेसृष्टीत काम करत आहेत. अशात आपल्या आजोबांच्या गाण्यावर पोलिसांनी व्हीडिओ केल्याचा आणि त्यावरून कोरोनाची जनजागृती केल्याचा खास आनंद करीनाला झाला आहे.