केकेचा मृत्यू नैसर्गिक की अनैसर्गिक? मृत्यूबाबत गूढ कायम

गायक केके यांच्या मृत्यूप्रकरणी न्यू मार्केट पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
केकेचा मृत्यू नैसर्गिक की अनैसर्गिक? मृत्यूबाबत गूढ कायम
KK's death natural or unnatural? The mystery of death remains

प्रसिद्ध गायक केके यांचं अवघ्या 53 व्या वयात निधन झालं आहे. गायक केके यांच्या मृत्यूप्रकरणी न्यू मार्केट पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस त्यांच्या कुटुंबीयांची वाट पाहत आहेत. त्यांची संमती मिळाल्यानंतर आणि मृतदेहाची ओळख पटवण्याची प्रक्रिया, चौकशी आणि पोस्टमॉर्टम केलं जाणार आहे. एसएसकेएम रुग्णालयात पोस्टमॉर्टमची व्यवस्था करण्यात येत आहे. दुपारनंतर मृतदेह ताब्यात दिला जाईल.

केके यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान त्यांची तब्येत बिघडल्याची बातमी आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पण केकेच्या मृत्यूचे खरे कारण पोस्टमॉर्टमनंतरच सांगता येईल, असे डॉक्टरांनी सांगितले होते. दरम्यान आता केकेच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमांच्या खुणा आढळल्याचं वृत्त आहे.

Singer KK dies after performing at a concert in Kolkata at the age of 53
Singer KK dies after performing at a concert in Kolkata at the age of 53

केके यांच्या निधनांतर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. तपास अधिकारी पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालाची वाट पाहत आहेत. पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही पाहिले. आतापर्यंत पोलीस या प्रकरणाची कार्यवाही अनैसर्गिक मृत्यू प्रकरण म्हणून करत आहेत.

Singer KK died after performing at a concert in Kolkata
Singer KK died after performing at a concert in Kolkata

लाईव्ह कॉन्सर्ट सुरू असताना केके याचा ह्रदयविकाराचा धक्का आला आणि तो जागेवरच कोसळला त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले आहे. केके च्या मृत्यूमुळे बॉलिवूड शोककळा पसरली आहे. कलकत्त्यातील गुरुदास कॉलेजच्या फेस्टिवलमध्ये ते लाईव्ह शो करीत होते. यादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याचं सांगितलं जात आहे. वयाच्या अवघ्या 53 व्या वर्षी केके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, ही बाब अद्यापही चाहत्यांना पचवणं कठीण झालं आहे.

 Last concert of popular singer KK in Kolkata
Last concert of popular singer KK in Kolkata

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in