Atul Parchure Death : मराठी सिनेसृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन

मुंबई तक

Atul Parchure Death : ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते कर्करोगाचा सामना करत होते. मात्र वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

ADVERTISEMENT

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन
atul parchure passed away marathi senior actor
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन

point

कॅन्सरसी झुंज अपयशी

point

वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Atul Parchure Death : ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं असल्याची बातमी समोर आली आहे. अतुल परचुरे यांना यकृताचा कॅन्सर झाला होता. यातून ते बरेही झाले होते. परंतू कॅन्सरशी त्यांची झुंज अपयशी ठरली असून वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. परचुरेंच्या या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. (atul parchure passed away marathi actor)  

अतुल परचुरे यांनी केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर नाट्य विश्वात देखील  मोलाचं योगदान दिलं आहे. मागील वर्षीच ते कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून काही प्रमाणात बरे झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी काम सुरू केलं होतं. पण आज म्हणजे वयाच्या 57 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.एक ताकदीचा अभिनेता, विनोदी अभिनेता आणि माणूस म्हणून उत्तम व्यक्ती अशी अतुल परचुरे यांची ओळख होती. अतुल परचुरे यांचे अनेक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींशी सलोख्याचे संबंध होते.

डॉक्टरांकडून झालेली मोठी चूक 

अतुल परचुरे यांनी काही महिन्यांपूर्वीच एक मुलाखत दिली होती ज्यामध्ये त्यांनी एक धक्कादायक माहिती दिली होती. त्यांनी मुलाखतीत सांगितलं होतं की, 'जेव्हा त्यांना कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे समजली तेव्हा ते डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेले पण सुरुवातीला डॉक्टरांनी त्यांच्या आजाराचे चुकीचे निदान केले आणि त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळू लागली.'

हे ही वाचा : Shiv Sena UBT: उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया, हृदयात होते ब्लॉकेज...नेमकं काय घडलं?

त्यावेळी अतुल परचुरे म्हणालेले, 'लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त मी कुटुंबीयांसह ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला गेलो होतो. काही दिवसांनी मला काहीही खाण्यास त्रास होऊ लागला होता. मला मळमळ व्हायची. माझ्या भावाने मला काही औषधे दिली पण उपयोग झाला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी अल्ट्रासोनोग्राफी केली. मला समजले की, काहीतरी चुकीचं घडतंय. डॉक्टरांनी सांगितले की माझ्या यकृतामध्ये सुमारे 5 सेंटीमीटरची गाठ आहे, आणि ती कर्करोगाची गाठ आहे. त्यावेळी मी डॉक्टरला विचारलं की, मी बरा होईन की नाही तेव्हा त्यांनी मी एकदम बरा होईल असं सांगितलं होतं.'

हे वाचलं का?

    follow whatsapp