Bigg Boss Marathi 5 : परदेसी गर्लच्या प्रेमात बारामतीचा गडी; बिग बॉसच्या घरात फुलणार लव्हस्टोरी?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बिग बॉस मराठीच्या घरात आता एका नव्या लव्ह केमिस्ट्रीची चर्चा सुरु झाली आहे.

point

कॅप्टन्सीचा टास्क खेळताना इरिना आणि वैभवची केमिस्ट्री फुलताना दिसतेय.

point

बिग बॉस मराठी सीझन 5 चा नवीन प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे.

Big Boss Marathi season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात आता एका नव्या लव्ह केमिस्ट्रीची चर्चा सुरु झाली आहे. इरिनाच्या प्रेमात वैभवच्या काळजाचा ठोका गुलीगत चुकणार का? हे पाहणं आता इन्ट्रेस्टिंग असणार आहे. 'बिग बॉस मराठी'चा नुकताच एक नवीन प्रोमो समोर आला आहे. यामध्ये कॅप्टन्सीचा टास्क खेळताना इरिना आणि वैभवची केमिस्ट्री फुलताना दिसतेय. या केमिस्ट्रीने आता सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. (big boss marathi season 5 irina rudakova and vaibhav chavhan latest Viral promo love chemistry)

बिग बॉस मराठी सीझन 5 च्या पहिल्या आठवड्यात प्रचंड भांडण, तंटा, हाणामारी पाहायला मिळाली. अशात आता दुसऱ्या आठवड्यात प्रेमाचे वारे वाहताना दिसण्याची शक्यता आहे. परदेसी गर्ल इरिना रूडाकोव्हा आणि बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण यांची नवीन लव्ह केमिस्ट्री फुलू शकते.

हेही वाचा : Mumbai Crime : अवजड बॅग, रक्ताचे डाग अन्...; दादर स्थानकात फुटलं मित्राच्या हत्येचे बिंग

कलर्स मराठीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, बिग बॉस मराठी सीझन 5 चा नवीन प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये वैभव चव्हाण वारंवार इरिनाचं कौतुक करताना दिसत आहे. त्यासोबतच तो तिला सर्वाधिक महत्त्व देतानाही दिसून येत आहे. प्रोमोमध्ये वैभव इरिनाला म्हणताना दिसत आहे की, 'कालपेक्षा आज जास्त सुंदर दिसतेस. मला तू जास्त महत्त्वाची व्यक्ती असल्याचं फिल होत आहे.' यावर इरिना वैभवला 'हो' असं उत्तर देते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : "तुम्ही डोनाल्ड ट्रम्प आहात का, जो बायडेन...", मनसे नेत्यांचे आदित्य ठाकरेंना खडेबोल

यावेळी जान्हवी वैभवला म्हणताना दिसतेय की, 'फॉरेनची पाटलीन मस्त आहे.' तर निक्की म्हणते, 'भाई... तुझं काय चाललंय?' आता ही लव्ह केमिस्ट्री कुठपर्यंत पोहोचणार हे पाहणं चाहत्यांसाठी रंजक ठरणार आहे. ते पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 

हेही वाचा : Govt Job:  कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरीची संधी! महिना मिळणार एवढा पगार...

बिग बॉस मराठी सीझन 5 च्या घरात आज (मंगळवार, 6 ऑगस्ट) पहिला कॅप्टन्सी टास्क खेळला जाणार आहे. कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन, असं या टास्कचं नाव आहे. यावेळी कॅप्टन बनण्यासाठी स्पर्धकांमध्ये आपआपसात वाद होतानाही दिसत आहेत. त्यामुळे पहिला कॅप्टन कोण होईल हे आजचा एपिसोड पाहिल्यानंतरच कळू शकेल. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT