"तुम्ही डोनाल्ड ट्रम्प आहात का, जो बायडेन...", मनसे नेत्यांचे आदित्य ठाकरेंना खडेबोल
Worli Assembly Constituency : वरळी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार देणार आहे. त्यावरून आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना टोला लगावला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वरळी विधानसभा मतदारसंघात राजकारण

आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे

वरळीच्या राजकारणात डोनाल्ड ट्रम्प, जो बायडेन
Aaditya Thackeray Sandeep Deshpande : (दिपेश त्रिपाठी, मुंबई) वरळी विधानसभा मतदारसंघातून मनसे संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे, असा प्रश्न माध्यमांनी विचारला. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, "मला वाटलं बायडेन येत आहेत." आदित्य ठाकरेंच्या याच विधानावरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पलटवार केला. (Sandeep Deshpande criticized Aditya Thackeray.)
माध्यमांशी बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. बाळासाहेब ठाकरेंचे उल्लेख न करता त्यांनी आदित्य ठाकरेंना चिमटा काढला.
आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे
संदीप देशपांडे म्हणाले, "मराठीत नाटक आलं होतं, झोपी गेलेला जागा झाला. साडेचार वर्षात त्यांना कधी वाटलं नाही की, महापालिकेसोबत बैठक घ्यावी; पण आज का त्यांना वाटलं? स्वतःचा नातेवाईक बिल्डर मित्र आहे, त्याला तुम्हाला तिकडे बसवायचा आहे म्हणून तुम्ही म्हाडाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली", असा दावा संदीप देशपांडे यांनी केला.
हेही वाचा >> "तुम्ही न्यायालयाला सांगू नका", सरन्यायाधीश चंद्रचूड ठाकरेंच्या वकिलावर भडकले
"गेल्या साडेचार वर्षात तुम्ही विधानसभेमध्ये पूर्वीच्या कुठल्या प्रश्नांवर चर्चा केली, रेकॉर्ड काढून बघा? तुम्हाला भाषणाची संधी मिळाली तेव्हा वरळीच्या संदर्भात किती प्रश्न विचारले? आज अचानक तुम्हाला जाग आलेली आहे, कारण तुमची झोप उडालेली आहे. तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे", असे प्रत्युत्तर संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना दिले.