Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉसमधून एक्झिट! अचानक शोमधून बाहेर कसे पडले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

bigg boss 18 gunaratna sadavarte taken out of the bigg boss house big reason behind maratha reservation
गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गुणरत्न सदावर्त बिग बॉसमधून बाहेर

point

अचानक बिग बॉसमधून का आले बाहेर

point

बिग बॉसमधून बाहेर पडण्याच कारण काय?

Gunaratna Sadavarte : बिग बॉस हिंदीच्या 18 व्या सीझनमध्ये सामील झालेले गुणरत्न सदावर्ते अचानक शोमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. एका खटल्याच्या संदर्भात सदावर्ते यांना घराबाहेर काढण्यात आल्याची माहिती बिग बॉसने एक्सवर दिली आहे. त्यामुळे नेमका हा खटला कोणता आहे? हे जाणून घेऊयात. (bigg boss 18 gunaratna sadavarte taken out of the bigg boss house big reason behind maratha reservation) 

ADVERTISEMENT

बिग बॉस हिंदीच्या 18 व्या सीझनचा पहिलाच आठवडा पार पडला आहे. या पहिल्या आठवड्यात कोणत्याच घराबाहेर काढले नव्हते. त्याऐवजी घरात बांधलेल्या गाढवाची शोमधून सुटका करण्यात आली होती. त्यानंतर मराठा आरक्षणावरून आज कोर्टात सुनावणी पार पडली होती. या सुनावणी दरम्यान कोर्टाने "मराठा आरक्षणाची महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू असताना सदावर्ते बिग बॉसमध्ये आहेत''. या प्रकरणातील मूळ याचिकाकर्त्यांना प्रकरणाचं गांभीर्यचं नाही का?'' असे म्हणत कोर्टाने सदावर्तेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता बिग बॉसने सदावर्ते यांना या खटल्यासाठी घराबाहेर काढले आहे. 

हे ही वाचा : Atul Parchure Death : मराठी सिनेसृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन

कोर्टात आज काय घडलं? 

डॉ. गुणरत्न सदावर्तेंच्या वर्तनावर हायकोर्टाची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "मराठा आरक्षणाची इतकी महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू असताना सदावर्ते बिग बॉसमध्ये जाऊन बसलेत", अशी माहिती इतर वकिलांकडून हायकोर्टाला देण्यात आलीये. या प्रकरणातील मूळ याचिकाकर्त्यांना प्रकरणाचं गांभीर्यचं नाही का? असा सवाल उपस्थित करत आपली याचिका सर्वात आधी घ्या म्हणून सदावर्ते आमच्यापुढे विनंती करत होते असं हायकोर्टाने म्हटलं आहे. आता युक्तिवाद करण्याची वेळ आली तर तेच गायब झाले? असाही सवाल हायकोर्टाने केलाय. 

हे वाचलं का?

मराठा आरक्षणाला विरोध करणा-या सर्व याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद संपला, आता कुणालाही युक्तिवाद करण्याची संधी मिळणार नाही, असं हायकोर्टाने म्हटलं आहे. पुढील सुनावणीत राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ युक्तिवाद करणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील प्रकरणाची हायकोर्टातील पूर्णपीठापुढील सुनावणी 19 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आलीये.

पुन्हा बिग बॉसमध्ये येणार का? 

बिग बॉसने एक्सवर दिलेल्या माहितीनुसार, गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या खटल्यासाठी घराबाहेर काढले गेले आहे. या खटल्यानंतर त्यांना पुन्हा बिग बॉसमध्ये जाता येणार आहेत. त्यामुळे ते पुन्हा बिग बॉसमध्ये दिसणार आहे.सध्या पहिल्याच आठवड्यात फक्त सदावर्तेच प्रचंड चर्चेत होते. त्यांचे डायलॉग, अॅक्टींग, पेहराव आणि भूमिका या सगळ्या गोष्टींमुळे ते प्रचंड चर्चेत आहेत. त्याच्या याच गोष्टींमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होतं आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Atul Parchure Death : 'डॉक्टरांनी केलेले चुकीचे उपचार', अतुल परचुरेंसोबत नेमकं काय घडलेलं?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT