मजा-मस्ती, ड्रामा अन् राडा... 'बिग बॉस मराठी'ला मिळाला नवीन होस्ट, घेऊन येतोय लय भारी ट्वीस्ट!

अजय परचुरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दोन वर्षांनी कलर्स मराठी आणि JioCinema वर 'बिग बॉस मराठी' चा नवा सिझन येत आहे.

point

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख हा शो होस्ट करणार आहे.

point

या नव्या सिझनमध्ये  एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता प्रेक्षकांना पहायला मिळेल. 

Bigg Boss Marathi Season 5 : संपूर्ण महाराष्ट्र गेली दोन वर्षे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होता, तो क्षण आता जवळ आला असून कलर्स मराठी आणि JioCinema वर 'बिग बॉस मराठी' चा नवा सिझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेळी बिग बॉस मराठीचे होस्टिंग बॅालीवूडचा स्टार, प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. (bigg boss marathi season 5 now ritesh deshmukh will host this reality show)

ADVERTISEMENT

कलर्स मराठी आणि JioCinema च्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर “बिग बॉस मराठी” चा व्हिडिओ शेअर केला आला असून त्यामध्ये बिग बॉसचा डोळा त्याच सोबत बॅालीवूडचा स्टयलिश हिरो आणि महाराष्ट्राचा मराठमोळा मुलगा सुपरस्टार रितेश देशमुख देखील दिसत आहे. या नव्या सिझनचे हे नवे सरप्राईज असणार असून या सिझनमध्ये  एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. 

हेही वाचा : HSC Results 2024: राज्यात '12वी'चा निकाल जाहीर, मुंबईचा कितवा क्रमांक?   

हिंदीमधल्या अफाट यशानंतर 'बिग बॉस' हा कार्यक्रम मराठीतही सुरु झाला. “बिग बॉस मराठी”चा आवाज संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरांत जाऊन पोहोचला. प्रेक्षक या कार्यक्रमावर बेहद फिदा झाले. “बिग बॉस मराठी” च्या पहिल्या चार सिझनने मराठी प्रेक्षकांची तुफान मने जिंकली आणि मराठमोळ्या थिमसह बिग बॉसच्या चारही सिझनची जोरदार चर्चा झाली. आता त्याच 'बिग बॅास' मराठीच्या नव्या सिझनची जोरात तयारी सुरू झालीय.  

हे वाचलं का?

हेही वाचा : Pune: आरोपीच्या फरार वडिलांच्या मुसक्या आवळल्या, बिल्डरवर काय होणार कारवाई?

बिग बॅासचे घर ही नेहमीच रसिकांच्या औत्सुक्याची, कुतूहलाची बाब असते. बिग बॅास मराठीचे हे आलिशान घर आकार घेऊ लागले आहे. तसेच बिग बॅासच्या घरातील अतरंगी मोहरे यांचीही कसून निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या सिझनमध्ये बिग बॅासच्या या घरात आणखी काय काय नाविन्य असेल, काय एक्स्ट्रा गॅासिप अर्थात एक्स्ट्रा मनोरंजन पहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT