Pune Drunk and Drive: आरोपीच्या फरार वडिलांच्या मुसक्या आवळल्या, बिल्डरवर काय होणार कारवाई?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

फरार विशाल अग्रवालसोबत काय घडलं?

point

आरोपीच्या वडिलांवर काय आरोप? 

पुणे : Pune Road Accident Latest update : पुणे रस्ते अपघातप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे शहरात शनिवारी (18 मे) मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात पोर्श या आलिशान कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा ही गाडी चालवत होता. आता याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी आरोपीचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल यांना अटक केली आहे. (big action by police in pune road accident case father of accused minor in custody)

ADVERTISEMENT

अपघातानंतर आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली, मात्र 15 तासांनंतर त्याला जामीन मिळाला. बाल न्याय मंडळ म्हणजेच जेजेबीने अपघातावर निबंध लिहिण्याच्या अटींवर आरोपीला जामीन मंजूर केला. पण, गुन्हा दाखल होताच आरोपीचे बिल्डर वडील विशाल अग्रवाल फरार झाले होते.   

हेही वाचा : '6 जूनला आरक्षण द्या, अन्यथा...', जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

फरार विशाल अग्रवालसोबत काय घडलं?

माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना मंगळवारी (21 मे) सकाळी संभाजीनगर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीचे वडील पुणे शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. अलिकडेच त्यांनी हॉटेल बांधले आहे. ते क्लबही चालवतात. त्यांची ब्रह्मा रिअॅल्टी नावाची कंपनी आहे. शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास झालेल्या त्यांच्या मुलाने दोन इंजिनीअर तरूण आणि तरूणीला पोर्श कारने चिरडलं. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'पराभव दिसू लागल्याने उद्धव ठाकरेंचं रडगाणं', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

आरोपीच्या वडिलांवर काय आरोप? 

या अपघातात 27 वर्षीय अनिस दुधिया आणि 25 वर्षीय अश्विनी कोष्टा यांना आपला जीव गमवावा लागला आहे. ते मूळचे मध्यप्रदेशचे रहिवासी असून पुण्यात कामाला होते. दोघेही इंजिनीअर होते. एफआयआरनुसार, ते दुचाकीवरून कल्याणीनगर जंक्शनवर पोहोचताच एका वेगवान पोर्श कारने त्यांना धडक दिली. यानंतर दोघंही रस्त्यावर आदळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

हेही वाचा : 'डोळे फुटलेत का तुझे भ&@#', कपिल पाटलांची पोलिसांवर अरेरावी

अपघाताच्या वेळी पोर्श कार 200 किलोमीटर वेगाने जात होती. कार चालवणाऱ्या आरोपी अल्पवयीन मुलाने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती आणि तो पार्टी करून परतत होता. या अपघातानंतर तिथे उपस्थित लोकांनी आरोपीला बेदम मारहाणही केली. आरोपीच्या वडिलांवर आपल्या अल्पवयीन मुलाला पोर्श चालवण्याची परवानगी दिल्याचा आरोप आहे. त्यांनी आपल्या मुलाला ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवायला दिली हा निष्काळजीपणा आहे. ज्या पबमध्ये अल्पवयीन मुलाला दारू दिली गेली त्या पबवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT