Manoj Jarange : '6 जूनला आरक्षण द्या, अन्यथा...', जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

manoj jarange patil warn mahayuti government start agitation from june 4 lok sabha election 2024 maratha reservation
आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही.
social share
google news

Manoj Jarange Patil Start Agitation : देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जूनला लागणार आहे. याच निकालाच्या दिवशी मनोज जरांगे पाटलांनी अंतरावली सराटीमध्ये आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. चार जूनला अंतरावली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही. 6 जूनपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा खूप मोठं आंदोलन होईल, असा इशारा मराठा आंदोलक (Maratha Protester)  मनोज जरांगे पाटलांनी (manoj jarange patil) सरकारला दिला आहे. (manoj jarange patil warn mahayuti government start agitation from june 4 lok sabha election 2024 maratha reservation) 

छत्रपती संभाजी नगरमध्ये मनोज जरांगे पाटील बोलत होते. चार जूनला अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरूवात होणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही. आम्हाला लोकसभेच्या गुलालात पडायचं नसून आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलालात पडायचं आहे. आणि तो गुलाल आमच्यासाठी महत्वाचा आहे.कारण आमचे लोकं मोठे झाले तर त्यांचा कल्याण होईल. त्यामुळे आमच्या न्यायासाठी आम्ही अंतरावलीत एकवठणार आहोत,असे जरांगे पाटील म्हणाले आहेत. 

हे ही वाचा : 'डोळे फुटलेत का तुझे भ&@#', कपिल पाटलांची पोलिसांवर अरेरावी

मराठा आणि कुणबी एकच आहे.सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करावी, हैदराबादचा गॅझेट लागू करावा, याचा आमच्या प्रमुख मागण्या आहेत.ठरल्याप्रमाणे आम्हाला 6 जूनपर्यंत आरक्षण द्यावे अन्यथा हे आंदोलन खूप मोठे होईल. ठरल्याप्रमाणे आम्हाला 6 जून पर्यंत आरक्षण द्यावे अन्यथा हे आंदोलन खूप मोठे होईल, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : "तावडेंना तिकीट दिलं होतं, पण...", फडणवीसांनी सांगितली सगळी स्टोरी

    follow whatsapp

    ADVERTISEMENT