Bigg Boss Marathi : अरबाजला वाचवायला गेला अन् स्वत:चाच दिला बळी, वैभव चव्हाण घराबाहेर!

मुंबई तक

ADVERTISEMENT

bigg boss marathi vaibhav chavan out of bigg boss house bigg boss marathi season 5
वैभव चव्हाण बिग बॉसच्या घराबाहेर!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वैभव चव्हाणने घेतला घराचा निरोप

point

अरबाजला वाचवता वाचवता स्वत:च झाला नॉमिनेट

point

वैभव चव्हाण सोबत या आठवड्यात आर्याही घराबाहेर

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरातून आज वैभव चव्हाण घराबाहेर पडला आहे. ‘जादुई दिवा’ या नॉमिनेशन टास्कमध्ये वैभव अरबाजला (Arbaz Patel) वाचवायला गेला होता. या वाचवण्यात वैभवचाच बळी गेला होता. वैभवच्या या खेळावरून भाऊच्या धक्क्यावरून रितेश देशमुख यांनी त्यांची कानउघाडणी देखील केली होती. मात्र आज अखेर वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) घराबाहेर आला आहे. त्यामुळे वैभव चव्हाणच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (bigg boss marathi vaibhav chavan out of bigg boss house bigg boss marathi season 5)

ADVERTISEMENT

'बिग बॉस मराठी'च्या घरात सातव्या आठवड्यात 'जादुई दिवा' हा नॉमिनेशन टास्क घेण्यात आला होता. स्पर्धकांना घरातील अन्य सदस्यांचे फोटो गळ्यात घालून संबंधित स्पर्धकाला नॉमिनेशनपासून वाचावायचं की नाही हा निर्णय घ्यायचा होता. 'जादुई दिवा' हा नॉमिनेशन टास्क खेळताना 'बिग बॉस' च्या घरात अनेक ट्विस्ट आले. सदस्यांना बझर वाजल्यावर जादुई दिव्याजवळ सर्वात आधी पोहोचणं गरजेचं होतं. या टास्कमध्ये निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर आणि आर्या जाधव हे सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. या स्पर्धकांपैकी आज वैभव घराबाहेर गेला आहे. 

हे ही वाचा : पोलीस महिलेला फुटला मातृत्वाचा पाझर! बाळाला पाजलं अंगावरचं दूध, पण तपासातून समोर आली भयंकर माहिती

'जादुई दिवा' टाक्स दरम्यान वैभवने चांगली रणनिती आखली होती. तो स्वत:लाही वाचवत होता आणि त्याला सेव्ह करणाऱ्या व्यक्तीला देखील तो वाचवत होता. मात्र टाक्स दरम्यान त्याच्याकडून एक चूक झाली. जादुई दिव्यासाठी त्याने दोन जागा अडवताना त्याने एक जागा अरबाजला वाचवण्यासाठी निक्कीला दिली होती. इथेच वैभवचा गेम झाला आणि तो देखून नॉमिनेट झाला. त्यामुळे अरबाजला वाचवायच्या चक्करमध्ये वैभवला घराबाहेर जावं लागलं आहे. 

हे वाचलं का?

दरम्यान नुकत्याच सुरू असलेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्या जाधव (Aarya Jadhao) आणि निक्की तांबोळी (Nikki Tamboli)  मध्ये प्रचंड वादावादी झाली. आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. त्यामुळे भाऊच्या धक्यावर आर्याला रितेश देशमुखने खूप सुनावलं. यानंतर बिग बॉसच्या आदेशानुसार आर्याला घरातून बाहेर काढण्यात आलं आहे.

त्याचवेळी आता दुसरीकडे आर्याचे चाहते प्रचंड संतापले आहेत. त्यांनी आर्या जाधवला फुल्ल सपोर्ट केला आहे. निक्कीला अद्दल घडवायला हवी होती असे म्हणत नेटकऱ्यांनी आर्याचे कौतुक केले आहे. आर्याला घराबाहेर काढल्यामुळे बिग बॉस मराठी पाहणं बंद करणार असल्याचा इशाराही नेटकऱ्यांनी दिला आहे. चाहत्यांच्या या पाठिंब्यामुळे बिग बॉस मराठीमध्ये नवा ट्विस्टही येऊ शकतो. आर्याची पुन्हा एन्ट्री होण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ganpati Visarjan 2024: गणपती विसर्जनाला विशेष लोकल सेवा, एका क्लिकवर पाहा संपूर्ण वेळापत्रक

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT