Bigg Boss Marathi च्या घरात 'कोकण हार्टेड गर्ल'चा जलवा; कॅप्टनसीमुळे ठरणार नवीन गेम चेंजर?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

‘कोकण हार्टेड गर्ल’ झाली पहिली कॅप्टन

point

कॅप्टनसीनंतर अंकिताची खास सोशल मीडिया पोस्ट

Ankita Prabhu-Walawalkar News : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील दुसरा आठवडा सुरू आहे. आता घरात अनेकजण एकमेकांबरोबर भांडताना दिसत आहेत. कालच्या (6 ऑगस्ट) एपिसोडमध्ये स्पर्धकांमध्ये कॅप्टन होण्यासाठी जोरदार चुरस पाहायला मिळाली. या कार्यासाठी वर्षा उसगांवकर यांना संचालक म्हणून नेमण्यात आले होते. यावेळी कॅप्टनसी टास्कसाठी दोन गटांमध्ये चांगलीच जुंपली होती. यासर्वात कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू-वालावलकर हिची कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली. (Kokan Hearted Girl Ankita Prabhu-Walawalkar become first captain in bigg boss marathi season 5 Will she become new game changer)

‘कोकण हार्टेड गर्ल’ झाली पहिली कॅप्टन

अंकिता प्रभू वालावलकर हिने बिग बॉस मराठीच्या घरातील पहिली कॅप्टन होण्याचा मान मिळवला आहे. ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ असं कॅप्टन्सी टास्कचं नाव होतं. आता या टास्कमुळे सीझनला त्यांचा पहिला कॅप्टन मिळाला आहे. मात्र दुसऱ्या गटात नाराजी पाहायला मिळत आहे. अरबाज, निक्की, जान्हवी आणि वैभव यांना कॅप्टन होता न आल्याने राग अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. तर, योगिता, आर्या, वर्षा उसगांवकर, डिपी आणि पंढरीनाथ कांबळे यांचा गट कॅप्टनसीसाठी योग्य कन्टेस्टंट (अंकिता) निवडून आणल्यामुळे खूप खुश आहेत. 

हेही वाचा : Vinesh Phogat Disqualified : पॅरिस ऑलम्पिकमध्ये विनेश अपात्र कशी ठरली?

आता चाहत्यांच्या नजरा अंकिताकडे आहेत. या आठवड्यात ती कॅप्टन म्हणून स्वत:ला कशी योग्य सिद्ध करते हे पाहणं इनट्रेस्टिंग असणार आहे. अंकिता या आठवड्यात गेम चेंजर ठरणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत.  

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : Vinesh Phogat : भारताच्या 'सुवर्ण' आशेला धक्का! विनेश ठरली अपात्र; नेमकं घडलं काय?

कॅप्टनसीनंतर अंकिताची खास सोशल मीडिया पोस्ट

अंकिता वालावलकर कॅप्टन्सी जिंकल्यानंतर टीम मेंबरने तिचं जल्लोषात अभिनंदन केलं. तिला धनंजय पोवारने कॅप्टनरूममध्ये उचलून नेलं. यावेळी संपूर्ण टीमने तिचं अभिनंदन केलं. 'आधी मी माणसं कमावली आणि त्या माणसांच्या सोबतीने मी कॅप्टनशिप पटकावली… बिग बॉसच्या पहिल्या कॅप्टन पदाचा भार मी याच माणसांच्या मदतीने सांभाळणार आहे. बाकी प्रेक्षकाक काळजी…', अशा कॅप्शनसह अंकिताने तिच्या इंस्टावर व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत चाहते तिचं मनभरून कौतुक करत आहेत. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT