Vinesh Phogat : भारताच्या 'सुवर्ण' आशेला धक्का! विनेश ठरली अपात्र; नेमकं घडलं काय?
Paris Olympic 2024 : महिला कुस्तीच्या 50 किलो वजनी गटात अंतिम लढतीच्या प्रतिक्षेत असलेल्या विनेशला अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही पदकाशिवाय तिला मायदेशी परतावं लागणार आहे. तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
भारताच्या 'सुवर्ण' आशेला धक्का!
वजन ठरले अपात्रतेला जबाबदार!
विनेश फोगाटची ऑलिम्पिक कारकीर्द
Vinesh Phogat Disqualified from Olympics : कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न एका निर्णयाने धुळीस मिळाले. पॅरिस ऑलम्पिक 2024 कुस्ती स्पर्धेत विनेश फोगाट हिने जबरदस्त कामगिरी करत अखेरच्या फेरीत धडक मारली. पण, एका निर्णयाने ती स्पर्धेबाहेर फेकली गेली आहे. महिला कुस्तीच्या 50 किलो वजनी गटात अंतिम लढतीच्या प्रतिक्षेत असलेल्या विनेशला अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही पदकाशिवाय तिला मायदेशी परतावं लागणार आहे. (Paris Olympic 2024 vinesh phogat disqualified from olympics cited overweight as the reason)
विनेश फोगाटकडून तिचे ऑलिम्पिक मेडल गमावले आहे. महिला कुस्तीच्या 50 किलो वजनी गटातून विनेश काल फायलनमध्ये पोहोचली होती. विनेशने क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. मात्र, आता अंतिम सामन्याआधीच ती अपात्र ठरली आहे. विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेशला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा : Uddhav Thackeray : दिल्लीत तीन दिवस मुक्काम कशासाठी? ठाकरे अखेर बोलले
वजन ठरले अपात्रतेला जबाबदार!
माहितीनुसार, विनेशचे वजन निर्धारित मानकांपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. विनेश फोगाटने प्री-क्वार्टर फायनलमध्ये जपानची ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू युई सुसाकी हिच्याविरुद्ध मोठा लढा देत 3-2 ने विजय मिळवला होता. यानंतर तिने उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ओक्साना लिवाचचा ७-५ असा पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक मारली होती.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा : "जे बांगलादेशात घडतंय, ते भारतातही घडू शकतं", काँग्रेस नेत्याचा इशारा
विनेश फोगाटची ऑलिम्पिक कारकीर्द
यंदाचे पॅरिस ऑलिम्पिक 2024 हे विनेश फोगाटचे तिसरे ऑलिम्पिक आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला दुखापतीमुळे थोड्या फरकाने कांस्यपदक जिंकता आले नाही. तर, टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिला 53 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत वेनेसा कलाडझिंस्कायाकडून पराभव पत्करावा लागला होता.
हेही वाचा : Maharashtra weather: राज्यातील 'या' भागांत मुसळधार! पुढील 3 दिवस कशी असणार स्थिती?
भारताच्या 'सुवर्ण' आशेला धक्का!
विनेश फोगाट ही भारतातील पहिली महिला कुस्तीपटू आहे जिने ऑलिम्पिकमधील अंतिम फेरी गाठली. पुरुष गटात सुशील कुमार आणि रवी दहिया हेही यापूर्वी ऑलिम्पिकमधील अंतिम फेरीत पोहोचले होते. पण दोघांनाही फक्त रौप्य पदक जिंकता आले, अशा स्थितीत विनेशला कुस्तीत देशाची पहिली सुवर्णपदक महिला विजेता बनण्याची संधी होती, पण तिच्या वजनामुळे ती अपात्र ठरली. यामुळे आता भारताच्या सुवर्ण आशेला धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT