Subodh Bhave : लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हाती देश सोपवून आपण मोकळे झालो आहोत

अभिनेते सुबोध भावे यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात हे परखड मत व्यक्त केलं आहे
We have been liberated by handing the country over to unfit politicians Says Subodh Bhave
We have been liberated by handing the country over to unfit politicians Says Subodh Bhave

लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हाती आपण मोकळे झालो आहोत असं वक्तव्य अभिनेते सुबोध भावे यांनी केलं आहे. आपण आजच्या घडीला विचार काय करतो? अमेरिकेला कधी जाणार? युरोपला कधी जाणार? आपल्या स्वतःच्या करिअर व्यतिरिक्त आपण देशाचा विचार करतो का असाही प्रश्न सुबोध भावे यांनी उपस्थित केला आहे.

सुबोध भावे यांनी एका कार्यक्रमात केलं भाषण

पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडून 'शतसूर्याचे तेज' या लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित नाट्य, संगीत आणि नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं . या कार्यक्रमात सुबोध भावे यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं . डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते. त्याचवेळी सुबोध भावे यांनी भाषणात हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हटलं आहे अभिनेते सुबोध भावे यांनी?

आपण सध्या उत्तम शिक्षण घेतो आणि करिअरच्या मागे लागतो. चांगली नोकरी कशी मिळेल. विदेशात जाऊन चांगली नोकरी कशी मिळेल हा प्रयत्न करत असतो. अशा विचारांमुले लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हातात देश उभारणीचं काम दिलं आहे. देश निर्मितीसाठी पुढच्या पिढीमध्ये शिक्षणाचा पाया रूजवावा लागेल. राजकारण्यांच्या हातात देश देऊन काहीही होणार नाही. ते काय करतील हे चित्र आपल्यासमोर आहे.

पुढच्या पिढीमध्ये राष्ट्रीय शिक्षणाची बीजं रोवून त्यांना देशाच्या चांगल्या उभारणीसाठी उभं करणं गरजेचं आहे. इंग्रजांनी जी शिक्षणपद्धती आपल्या देशात राबवली ती चांगले नोकरदार तयार व्हावेत म्हणून चांगले मालक तयार व्हावेत म्हणून नाही. आजही आपण तीच व्यवस्था पाळत आहोत. त्यामुळेच काल परवा कडे वक्तव्य झालं तशी वक्तव्य होतात. मुंबई, महाराष्ट्रातून लोक निघून गेले तर पैसेच राहणार नाहीत असं वक्तव्य करायला नेते धजावतात असं म्हणत राज्यपालांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in