Raghav Chadha यांचं रॉयल सासर! मेव्हणी ग्लोबल स्टार तर, सासरे…

रोहिणी ठोंबरे

चाहत्यांची प्रतीक्षा संपली! अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा विवाहबंधनात अडकणार आहेत. उदयपूरच्या द लीला पॅलेसमध्ये सात फेरे घेऊन दोघंही एकमेकांची साथ कायमची धरणार आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Parineeti Chopra Family : चाहत्यांची प्रतीक्षा संपली! अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा विवाहबंधनात अडकणार आहेत. उदयपूरच्या द लीला पॅलेसमध्ये सात फेरे घेऊन दोघंही एकमेकांची साथ कायमची धरणार आहेत. आता चाहत्यांना परिणीतीला आणि राघव चढ्ढा यांना लग्नाच्या गेटअप लुकमध्ये पाहायचं आहे. पण लग्नाआधी, आज आपण परिणीती चोप्राच्या कुटुंबाची म्हणजेच राघव चढ्ढा यांच्या सासरची ओळख करून घेऊयात. (Raghav Chadha’s in-law’s Know everything about Parineeti Chopra’s family)

राघव चड्ढा यांचे सासरे काय करतात?

परिणीती पंजाबी कुटुंबातील आहे. अभिनेत्री तिच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. परिणीतीच्या वडिलांचं नाव म्हणजेच राघव चड्ढा यांच्या होणाऱ्या सासऱ्यांचं नाव पवन चोप्रा आहे, जे एक मोठे उद्योगपती आहेत. पवन चोप्रा अंबाला कॅन्टोन्मेंटमध्ये भारतीय लष्करासाठी सप्लायर म्हणूनही काम करतात. परिणीतीच्या वडिलांना गाण्याचीही आवड आहे.

‘जनतेपेक्षा त्यांना हायकमांड…’, सुप्रिया सुळेंच्या देवेंद्र फडणवीसांना कानपिचक्या

परिणीतीची आई काय करते?

परिणीतीची आई आणि राघव चड्ढा यांच्या होणाऱ्या सासूबाई रीना मल्होत्रा ​​या एनआरआय आहेत. त्यांचा जन्म सिंगापूर येथे झाला. एकेकाळी त्या केनियात राहायच्या. मात्र, नंतर त्या भारतात शिफ्ट झाल्या. परिणीतीची आई हाऊसमेकर तसंच आर्टिस्टही आहेत. त्या त्यांची चित्रं आणि कला प्रदर्शनांमुळे चर्चेत राहतात.

राघव चड्ढांचे मेव्हणे दिसायला आहेत खूपच देखणे!

परिणीती चोप्राला दोन भाऊ आहेत. एका भावाचे नाव सहज चोप्रा आणि दुसऱ्याचे नाव शिवांग चोप्रा आहे. अभिनेत्रीचे दोन्ही भाऊ दिसायला खूप देखणे आहेत. परिणीती दोन्ही भावांच्या खूप जवळ आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसते.

हे वाचलं का?

    follow whatsapp