कॉमेडियन राजू श्रीवास्तव ब्रेन डेड अवस्थेत, कुटुंब करतंय प्रार्थना
कॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत नवी माहिती समोर आली आहे. कॉमेडियन राजू श्रीवास्तवची प्रकृती आधीपेक्षा नाजूक झाली आहे. राजू श्रीवास्तवची अवस्था ब्रेन डेड झाली आहे. राजू श्रीवास्तवचे मुख्य सल्लागार अजित सक्सेना यांनी ही माहिती दिली आहे. आता त्यांना आराम मिळावा म्हणून आम्ही सगळे देवाकडे प्रार्थना करत आहोत असंही त्यांनी सांगितलं. कॉमेडियन राजू श्रीवास्तवची प्रकृती एकदम नाजूक […]
ADVERTISEMENT

कॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत नवी माहिती समोर आली आहे. कॉमेडियन राजू श्रीवास्तवची प्रकृती आधीपेक्षा नाजूक झाली आहे. राजू श्रीवास्तवची अवस्था ब्रेन डेड झाली आहे. राजू श्रीवास्तवचे मुख्य सल्लागार अजित सक्सेना यांनी ही माहिती दिली आहे. आता त्यांना आराम मिळावा म्हणून आम्ही सगळे देवाकडे प्रार्थना करत आहोत असंही त्यांनी सांगितलं.
कॉमेडियन राजू श्रीवास्तवची प्रकृती एकदम नाजूक
कॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत नवी माहिती समोर आली आहे. त्याची अवस्था पहिल्यापेक्षा जास्त नाजूक झाली आहे. राजू श्रीवास्तवचे सल्लागार अजित सक्सेना यांनी ही माहिती दिली आहे. देव काही तरी चमत्कार करेल यावरच आम्ही भरवसा ठेवून आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं. राजू श्रीवास्तवला हार्ट अटॅक आल्याने त्याला दिल्लीतल्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज सकाळी डॉक्टरांनी जी माहिती दिली त्यानुसार राजू श्रीवास्तव ब्रेन डेड अवस्थेत गेला आहे.
एम्स रूग्णालयाने दिलेल्या माहितीनंतर राजू श्रीवास्तवचे चाहते चिंतेत
एम्स रूग्णालयाने दिलेल्या माहितीनंतर राजू श्रीवास्तवचे चाहते चिंतेत सापडले आहेत. राजू श्रीवास्तवच्या कानापूर येथील घरी नातेवाईक, ओळखीचे लोक तसंच मित्र परिवार भेटण्यासाठी येतो आहे. राजू श्रीवास्तव यांच्यासोबत कायम असलेले पीए गर्वित नारंग दिल्लीहून अधिक कानपूरला पोहचले.
गर्वित नारंग यांनी राजू श्रीवास्तवबाबत दिली माहिती
राजू श्रीवास्तवचे पीए गर्वित नारंग यांनी आज तकला दिलेल्या माहितीनुसार राजू श्रीवास्तव यांची प्रकृती बिघडली आहे असं सांगितलं. तसंच आज तकने राजू श्रीवास्तवच्या मित्रांशीही संवाद साधला. त्यानुसार हे समजलं आहे की रात्री उशिरा राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूला सूज आली आहे. गर्वित नारंग म्हणाले की की डॉक्टरांनी ही माहिती दिली की राजू यांना इंजेक्शन देण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या मेंदूला सूज आली. त्यानंतर त्यांची प्रकृती जास्त बिघडली आहे.