अहो ऐका ना ! Bigg Boss च्या घरात शमिता शेट्टीने मराठमोळ्या अंदाजात काढली राकेश बापटची आठवण
बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आणि मराठमोळा अभिनेता राकेश बापट यांच्यातली केमिस्ट्री गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनली आहे. बिग बॉस ओटीटीच्या घरात राकेश आणि शमिता स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. यावेळी दोघांचा रोमँटीक अंदाज सर्वांना आवडला होता. सलमान खान सूत्रसंचालन करत असेलल्या बिग बॉसच्या आगामी हंगामातही शमिता शेट्टी सहभागी झाली आहे. परंतू घरात आता तिला […]
ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आणि मराठमोळा अभिनेता राकेश बापट यांच्यातली केमिस्ट्री गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनली आहे. बिग बॉस ओटीटीच्या घरात राकेश आणि शमिता स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. यावेळी दोघांचा रोमँटीक अंदाज सर्वांना आवडला होता.
सलमान खान सूत्रसंचालन करत असेलल्या बिग बॉसच्या आगामी हंगामातही शमिता शेट्टी सहभागी झाली आहे. परंतू घरात आता तिला राकेश बापटची आठवण यायला लागली आहे. यावेळी घरातील सदस्यांसोबत बोलत असताना तिने आपली खास आठवण सांगितल्यानंतर प्रत्येक जण तिची मस्करी करायला लागला आहे.
प्राजक्ता माळीचा पार्टी लूक करतोय चाहत्यांना घायाळ
विधी पांड्या, उमर रियाज, विशाल कोटीयन, तेजस्वी प्रकाश, जय भानूशाली आणि शमिता शेट्टी एकत्र बसून गप्पा मारत असताना जयने शमिताला मराठी बायको आपल्या नवऱ्याला कसं बोलावते अहे सांगितलं. यावेळी शमितानेही त्याची बरोबर नक्कल करत, अहो ऐकलंत का असं म्हणत राकेशवर असलेल्या प्रेमाची कबुली दिली आहे.