ओमकार टॅटूमुळे गदारोळ… पतीच्या मृत्यूनंतर झाली ट्रोल, कोण आहे ‘ही’ अभिनेत्री?
Mandira Bedi and controversy : मंदिरा बेदी एक अशी अभिनेत्री आहे जिला स्वतःच्या अटींवर काम करायला आवडते. म्हणूनच कदाचित वादविवाद तिचा पाठ सोडत नाही. ही अभिनेत्री कधी तिच्या ब्लाउजमुळे चर्चेत आली आहे, तर कधी तिच्या पाठीवर बनवलेल्या टॅटूने तिला अडचणीत आणले आहे. त्याच वेळी, जेव्हा तिच्या पतीच्या मृत्यूनंतर, एका मित्रासोबत काढलेल्या फोटोमुळे तिला ट्रोल करण्यात […]
ADVERTISEMENT

Mandira Bedi and controversy : मंदिरा बेदी एक अशी अभिनेत्री आहे जिला स्वतःच्या अटींवर काम करायला आवडते. म्हणूनच कदाचित वादविवाद तिचा पाठ सोडत नाही. ही अभिनेत्री कधी तिच्या ब्लाउजमुळे चर्चेत आली आहे, तर कधी तिच्या पाठीवर बनवलेल्या टॅटूने तिला अडचणीत आणले आहे. त्याच वेळी, जेव्हा तिच्या पतीच्या मृत्यूनंतर, एका मित्रासोबत काढलेल्या फोटोमुळे तिला ट्रोल करण्यात आले तेव्हा एकदाची हद्द झाली. (Sometimes from modern blouses and sometimes trolls from tattoos; Mandira Bedi and controversy is nothing new)
मंदिरा बेदीने खास फोटो शेअर करत मौनी रॉयला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
मंदिरा 15 एप्रिलला तिचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. पण फिटनेसच्या बाबतीत अभिनेत्री कोणालाही मात देऊ शकते. मंदिराने 1994 मध्ये शांती या मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण केले. पण 29 वर्षांच्या कारकिर्दीत ही अभिनेत्री अनेक वादांचाही भाग राहिली आहे.
टॅटूवरून वाद
2004 मध्ये मंदिराने मानेच्या मागच्या बाजूला ओंकारचा टॅटू काढला, त्यामुळे 2010 मध्ये मोठा गोंधळ झाला. तिच्या या टॅटूने अनेकांच्या भावना दुखावल्या होत्या. एवढा गदारोळ झाला की मंदिराला ते टॅटू काढून टाकावे लागले. त्यावेळी अभिनेत्री मंदिरा खूप नाराज झाली होती.
या घटनेची आठवण करून देताना मंदिरा म्हणाली, हे सर्व 2007 क्रिकेट विश्वचषकादरम्यान सुरू झाले. त्या दिवशी मी त्या स्पर्धेची तयारी करत होते. पंजाबच्या लोकांनी हा टॅटू टीव्हीवर पाहिला आणि त्यानंतर एकच गोंधळ उडाला. लोकांनी माझा पुतळाही जाळला. मला माफीनामा वर्तमानपत्रात छापून द्यावा लागला. काही दिवस हे प्रकरण शांत झाले होते, पण नंतर दोन वर्षांनी पुन्हा गदारोळ झाला. लुधियाना येथील एका कार्यक्रमासाठी मी साडी नेसली होती. माझ्या मागच्या बाजूने कोणीतरी फोटो काढून प्रकरण उखरले. 2010 च्या निवडणुकांदरम्यान माझ्यावर गुन्हा देखील दाखल केला होता, असं ती म्हणाली.