आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीचा अपघात, मर्सिडिज कारचं मोठं नुकसान; म्हणाली...'वाईट दिवस..'
Actress Rupali Bhosale Car Accident : अभिनेत्री रुपाली भोसलेच्या कारचा अपघात झालाय. याबाबतची माहिती तिने इन्स्टाग्रामवरुन दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अभिनेत्री रुपाली भोसलेचा अपघात झालाय

रुपाली भोसलेने अपघाताबद्दलची माहिती इन्स्टाग्रामवरुन दिलीे आहे
Actress Rupali Bhosale Car Accident : आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसले हिचा अपघात झालाय. या अपघातात रुपाली भोसलेच्या कारचं मोठं नुकसान झालंय. तिने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून या कार अपघाताची माहिती दिली आहे. यामध्ये तिच्या मर्सिडिज कारचं मोठं नुकसान झालंय. शिवाय, अपघात झालाय, आजचा दिवस वाईट असल्याचंही तिने म्हटलंय. विशेष म्हणजे तिने कार काही महिन्यांपूर्वीच खरेदी केली होती.
अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी नेहमी काहीना काही शेअर करताना पाहायाला मिळते. मात्र, आता तिने अपघात झाल्याची माहिती शेअर केल्यानंतर तिचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. रुपाली भोसले हिला आई कुठे काय करते? या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. तिने साकारलेल्या संजना या पात्राला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाली. तिने या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारली आहे. मात्र, तरी देखील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.