बोटं छाटली, गळा दाबला अन् सगळंच लाइव्ह दाखवलं... तीन मुलींसोबत घडलेल्या भयंकर घटनेने अख्खं जग हादरून गेलं!

मुंबई तक

19 सप्टेंबरची रात्र अर्जेंटिना देशासाठी धक्कादायक ठरली. एका ड्रग्ज टोळीने तीन मुलींचं अपहरण केले आणि नंतर तिच्यासोबत अत्यंत क्रूर कृत्य केलं. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांनी आधी पीडित मुलींना निर्दयीपणे मारहाण केली, नंतर त्यांची नखे उपटून टाकली आणि क्रूरपणे बोटं छाटली.

ADVERTISEMENT

तीन मुलींसोबत घडलेल्या भयंकर घटनेने अख्खं जग हादरून गेलं!
तीन मुलींसोबत घडलेल्या भयंकर घटनेने अख्खं जग हादरून गेलं!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तीन मुलींसोबत घडलेल्या भयंकर घटनेने अख्खं जग हादरून गेलं!

point

बोटं छाटली, गळा दाबला अन् सगळंच लाइव्ह दाखवलं...

Crime News: 19 सप्टेंबरची रात्र अर्जेंटिना देशासाठी धक्कादायक ठरली. एका ड्रग्ज टोळीने तीन मुलींचं अपहरण केले आणि नंतर तिच्यासोबत अत्यंत क्रूर कृत्य केलं. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांनी आधी पीडित मुलींना निर्दयीपणे मारहाण केली, नंतर त्यांची नखे उपटून टाकली आणि क्रूरपणे बोटं छाटली. यानंतरही जेव्हा पीडित मुलींनी आरोपींच्या मागणीला नकार दिला तेव्हा त्यांचा गळा दाबून खून करण्यात आला. सोशल मीडियावर हल्ल्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग झाल्यामुळे ही घटना आणखी भयानक ठरली.

स्थानिकांमध्ये आक्रोश  

ही घटना उघडकीस येताच नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं. हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पीडितांच्या कुटुंबियांसोबत संसदेकडे धाव घेतली. लोकांनी "लारा, ब्रेंडा, मोरेना" असे लिहिलेले बॅनर आणि त्यांचे फोटो असलेले पोस्टर सोबत घेऊन न्यायाची मागणी केली. ब्रेंडाचे वडील लिओनेल डेल कास्टिलो यांनी माध्यमांना सांगितलं की, त्यांच्या मुलीची प्रकृती इतकी वाईट होती की कुटुंबीय तिला ओळखू सुद्धा शकत नव्हते. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत तीन पुरुष आणि दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. बोलिव्हियाच्या सीमावर्ती शहरात व्हिलाझोन येथे एका संशयिताला अटक करण्यात आली; त्याच्यावर कारने लॉजिस्टिक सपोर्ट पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी 20 वर्षीय पेरू देशाचा नागरिक असलेला सूत्रधार अद्याप फरार असल्याची माहिती दिली. त्याचा फोटो प्रसिद्ध झाला असून त्याचा शोध सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

हे ही वाचा: मुंबईची खबर: देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण! ‘या’ स्थानकांदरम्यान बोगद्याचं बांधकाम अन्...

पीडितांच्या कुटुंबियांनी दिली माहिती  

स्थानिक माध्यमे आणि सुरुवातीच्या पोलिस अहवालांमध्ये वेश्या म्हणून काम करण्याच्या बहाण्याने तिन्ही मुलींना पार्टीमध्ये आणण्यात आले होतं, असंही म्हटलं आहे. मात्र, लाराची मावशी, डेल व्हॅले गॅल्वन यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि लाराचा ड्रग्ज किंवा वेश्याव्यवसायाशी कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे, ब्रेंडा आणि मोरेनाचा चुलत भाऊ फेडेरिको सेलेबोनने कबूल केले की ते दोघेही कधीकधी पैसे कमवण्यासाठी देहव्यापार करत असत, परंतु कुटुंबियांना याची माहिती नव्हती.

हे ही वाचा: आधी लग्न, घटस्फोट अन् पुन्हा... लग्नाच्या आदल्या रात्री अर्धवट जळालेला मृतदेह, त्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

अर्जेंटिनामध्ये अंमली पदार्थांची तस्करी आणि हिंसाचार वाढत असल्याचं समोर येत आहे. लॉस मोनोस आणि अलवाराडो क्लॅन सारख्या मोठ्या टोळ्या सतत विभागासाठी लढत असतात, तसेच लहान टोळ्या ड्रग्ज तस्करी आणि खंडणीद्वारे परिसरात आपले वर्चस्व प्रस्थापित करत असल्याचं सांगितलं जातं.

हे वाचलं का?

    follow whatsapp