आधी लग्न, घटस्फोट अन् पुन्हा... लग्नाच्या आदल्या रात्री अर्धवट जळालेला मृतदेह, त्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
24 वर्षीय अंशिका नावाच्या एका तरुणीने आधी प्रेम, मग लग्न आणि घटस्फोट या सगळ्यामधून गेल्यानंतर पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण दुर्दैवाने तिच्यासोबत एक भयंकर घटना घडली. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

लग्नाच्या आदल्या रात्री अर्धवट जळालेला मृतदेह

त्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
Crime News: 24 वर्षीय अंशिका नावाच्या एका तरुणीने आधी प्रेम, मग लग्न आणि घटस्फोट या सगळ्यामधून गेल्यानंतर पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तिने स्वप्न पाहिलं होतं की 24 सप्टेंबर 2025 हा तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असेल, तेव्हा ती नवरी बनून तिच्या सासरच्या घरी जाईल. पण दुर्दैवाने तिच्यासोबत एक भयंकर घटना घडली. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
कोर्टात लग्न केलं अन् काही काळातच घटस्फोट
संबंधित घटना हिमाचल प्रदेशातील असल्याची माहिती आहे. अंशिकाची भेट भारतीय सैन्यात नोकरी करणाऱ्या प्रवेश कुमार नावाच्या तरुणासोबत झाली. त्यांच्या मैत्रीचं पुढे प्रेमात रूपांतर झालं आणि त्याचं प्रेम लवकरच फुलत गेलं. एकमेकांवर नि:स्वार्थी प्रेम आणि एकत्र जगण्या- मरण्याची शपथ घेऊन त्यांनी 2023 मध्ये कोर्टात लग्न केलं. खरंतर हे लग्न त्यांच्यासाठी प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक होतं. पण त्यांच्या कुटुंबियांना त्यांचं हे नातं मान्य नव्हतं. लग्नानंतर कुटुंबियांमध्ये वाद आणि तणाव वाढत गेला. याच कारणामुळे दोघांच्याही नातेसंबंधात दरी निर्माण झाली आणि अशी परिस्थिती ओढवली की अंशिका आणि प्रवेश यांनी 2024 मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. अशाप्रकारे त्यांचं एक वर्षाचे नातं तिथेच थांबलं.
कुटुंबियांच्या संमतीने लग्न करण्याचा निर्णय
पण, प्रेमाच्या वाटेत बरेच अडथळे येत असल्यामुळे हा मार्ग सोपा नसतो, असं म्हटलं जातं. अंशिका आणि प्रवेशच्या नात्याबाबतीत सुद्धा असंच घडलं. घटस्फोट झाल्यानंतरही अंशिका आणि प्रवेश एकमेकांपासून दूर राहू शकले नाहीत. त्यांचं एकमेकांवरचं प्रेम तसंच राहिलं. म्हणूनच, मे 2025 मध्ये त्यांनी पुन्हा कोर्टात लग्न केलं. यावेळी, त्यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या संमतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. हळूहळू कुटुंबियांमध्ये एकमेकांबद्दल गैरसमज कमी होऊ लागले. अखेर, सर्वांनी 24 सप्टेंबर रोजी अंशिका आणि प्रवेश यांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला. अंशिकासाठी हा क्षण खूप खास होता.
हे ही वाचा: मुंबईची खबर: देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण! ‘या’ स्थानकांदरम्यान बोगद्याचं बांधकाम अन्...
अंशिकाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत...
पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. 22 सप्टेंबरच्या रात्री, प्रवेश जम्मूवरून घरी परतला. त्यावेळी त्याचं अंशिकाशी फोनवर बोलणं झालं. या बोलण्यातून, अंशिका गर्भवती असल्याचं त्याला कळलं. दरम्यान, प्रवेशचे काका संजीव कुमार या नात्याबद्दल नाराज होते. त्यांना प्रवेश आणि अंशिकाचं लग्न मान्य नव्हतं. अचानक, दुसऱ्याच दिवशी, 23 सप्टेंबर रोजी, अंशिकाचा मृतदेह तिच्या घरापासून 500 मीटर अंतरावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला. ही बातमी ऐकताच घरातील आनंदाचं वातावरण शोकात बदललं.