chaitanyananda swamy arrest : मुलींचं लैंगिक शोषण आणि अश्लील मेसेज केल्याच्या आरोपावरून चैतानंद सरस्वतीला 5 दिवसांची पोलीस कोठडी
chaitanyananda swamy arrested : विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित धर्मगुरु चैतानंद सरस्वती यांच्यावर न्यायालयाच्या आदेशाची टांगती तलवार आहे. विद्यार्थिनींचे लैंगिक छळ केल्याच्या आरोपातून 62 वर्षीय धर्मगुरुला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बाबाचे विद्यार्थिनींशी गैरवर्तन

पाच दिवसांची पोलीस कोठडी
Chaitanyananda swamy arrested : विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित धर्मगुरु चैतानंद सरस्वती यांच्यावर न्यायालयाच्या आदेशाची टांगती तलवार आहे. विद्यार्थिनींचे लैंगिक छळ केल्याच्या आरोपातून 62 वर्षीय धर्मगुरुला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर मॅजिस्टे्रेट रवी यांनी हा निकाल दिला. श्री शारदा इन्स्टिस्ट्यूटच्या विद्यार्थिनींशी गैरवर्तन आणि शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप स्वामी चैतानंद सरस्वती यांच्यावर आहे.
हे ही वाचा : लेकीनं पाकिटातून 500 रुपये घेतले, वडिलांना कळताच शेतात नेलं अन् भयानक कट रचत नको तेच...
चैतानंद सरस्वतीला आग्रातून अटक
रविवारी सकाळी चौतानंद सरस्वतीला आग्रातून अटक करण्यात आली, त्यानंतर ड्युटी मॅजिस्ट्रेट रवी यांच्यासमोर दुपारी 3.40 वाजताच्या सुमारास हजर करण्यात आले. पटियाला हाऊस कोर्टात झालेल्या एका सुनावणीदरम्यान, पोलिसांनी सांगितलं की, गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे आग्रा येथील एका हॉटेलातून चैतानंद बाबाला अटक करण्यात आली. पोलिसांनी कोर्टाला सांगितलं की, बाबावर विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. दिल्ली एसपींनी सांगितलं की, बाबा विद्यार्थिनींना छेडायचा तसेच त्यांना धमकवायचा आणि अश्लील कमेंट्स करत मेसेजही पाठवायचा.
मुलींच्या बाथरूममध्ये बसवलेला कॅमेरा मोबाईल फोनशी कनेक्टेड
पोलिसांनी सांगितलं की, चैत्यानंदने मुलींच्या बाथरूममध्ये एक कॅमेरा बसवला आहे, तो कॅमेरा त्याच्या मोबाईल फोनशी जोडण्यात आला होता. तो स्वामी मुलींना सतत त्रास द्यायचा. संबंधित प्रकरणात दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं की, आम्हाला चैत्यानंदच्या सिस्टीमचा आयपी अॅड्रेस एकदा तपासण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणात एक दोन नाही,तर तब्बल 16 मुलींनी चैत्यानंद बाबाविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.
हे ही वाचा : तामिळनाडूमधील रॅलेत चेंगराचेंगरी होऊन 39 जणांचा मृत्यू, विजय थलापतीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
या प्रकरणात बचाव वकील म्हणाले की, चैत्यानंद स्वामीसोबत पोलिसांचं वर्तन हे योग्य नाही. त्यांचं स्वास्थ ठीक नाही, तसेच ते सीनियर सिटीझन आहेत, ते संत आहेत. पोलिसांनी बाबाकडून सर्व गोष्टी जप्त केल्या आहेत, तरीही पोलिसांना आणकी रिमांड कशाला हवी आहे, असं ते म्हणाले.