VIDEO : धाराशिवमध्ये तरुण दुचाकीसह वाहून गेला, बहाद्दर गावकऱ्यांनी शक्कल लढवली; तरुणाचा जीव वाचवला
Marathwada Flood : पूरामध्ये दुचाकीसह वाहत चाललेल्या तरुणाला गावकरांनी वाचवलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

धाराशिवमध्ये तरुण दुचाकीसह वाहून गेला

बहाद्दर गावकऱ्यांनी शक्कल लढवली; तरुणाचा जीव वाचवला
Marathwada Flood : मराठवाड्यातील पूराची (Marathwada Flood) स्थिती अजूनही ओसरलेली नाही. नद्यांना महापूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे. अशा परिस्थितीत अनेक लोक आपल्या गावाकडं जाण्यासाठी किंवा कामावर जाण्यासाठी पाण्यातून जाण्याची जोखीम घेतात. त्यामुळे अनेकदा या पाऊलामुळे लोकांना जीव गमवावा लागलाय. मात्र, धाराशिव (Dharashiv Flood) जिल्ह्यात आज वाहत जात असलेल्या तरुणाला गावकऱ्यांनी वाचवलं आहे. नेमकं काय घडलंय? जाणून घेऊयात..
तरुण दुचाकीसह प्राण्याचा प्रवाहात वाहत गेला अन्..
धाराशिव जिल्ह्यातील काजळा गावाजवळील वाघोली पुलावरून जाताना एक तरुण पुराच्या पाण्यात दुचाकीसह वाहून गेला. सुदैवाने, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला. धाराशिव जिल्ह्यातील आज (दि.28) थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आलाय. अधिकची माहिती अशी की, इर्ला गावचा निखिल ढोराळकर हा तरुण मोटरसायकलवरून धाराशिवकडे निघाला होता. त्याने पुलावर पाण्याचा मोठा प्रवाह असताना दुचाकीवरून पूल पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पुलावरून जोरात वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्याची दुचाकी थेट पाण्याच्या प्रवाहात ओढली गेली. क्षणात दुचाकीसह तरुण पाण्यात वाहून गेला.