पेशाने शिक्षिका असलेल्या पत्नीची केली निर्घृण हत्या! नंतर, फेसबुक लाइव्हवर केला दावा अन् पोलिसांसमोर...
एका 42 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली. इतकेच नव्हे तर आरोपीने फेसबुक लाइव्हवर आपला गुन्हा कबूल केला आणि नंतर, पोलिसांसमोर सरेंडर केल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पेशाने शिक्षिका असलेल्या पत्नीची केली निर्घृण हत्या!

फेसबुक लाइव्हवर केला दावा अन् पोलिसांसमोर...
Murder Case: केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील पुनालुरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका 42 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली. इतकेच नव्हे तर आरोपीने फेसबुक लाइव्हवर आपला गुन्हा कबूल केला आणि नंतर, पोलिसांसमोर सरेंडर केल्याची माहिती समोर आली आहे.
खाजगी शाळेत शिक्षिका होती..
प्रकरणातील मृत महिलेची ओळख 39 वर्षीय शालिनी अशी झाली असून ती वलाकोड येथे एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. संबंधित घटना सोमवारी सकाळी जवळपास 6 वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. प्रकरणातील आरोपीचं नाव ऐसेक असून त्याने आपल्या पत्नीवर हल्ला केला आणि या हल्ल्यात पीडितेचा मृत्यू झाला. हत्येनंतर, ऐसेकने आपल्या फेसबुक अकाउंटवर अडीच मिनिटांचा लाइव्ह व्हिडीओ स्ट्रीम केला आणि त्यात आरोपीने शालिनीची हत्या केल्याचं कबूल केलं.
हे ही वाचा: "पतीला पाळीव उंदीर म्हणणं मानसिक क्रूरता..." घटस्फोटाच्या 'त्या' प्रकरणात हायकोर्टाचा धक्कादायक निर्णय...
व्हिडीओमध्ये आरोपी पतीचा दावा
ऐसेकने व्हिडीओमध्ये शालिनीचे काही अज्ञात पुरुषांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला. तसेच, ती आपल्या मुलांकडे सुद्धा दुर्लक्ष करत असल्याचं पतीने सांगितलं. इतकेच नव्हे तर, शालिनी पतीला त्यांचं स्वत:चं बनवलेलं घर सोडण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचा देखील पतीने गंभीर आरोप केला.
सूत्रांच्या माहितीनुसार, पती आणि पत्नीमधील कौटुंबिक वादामुळे दोघेही बराच काळ एकमेकांपासून वेगळे राहत होते. हत्येनंतर, लाइव्ह व्हिडीओ बनवून ऐसेक घटनास्थळावरून फरार झाला. मात्र, सकाळी जवळपास 9 वाजताच्या सुमारास पुनालुर पोलीस स्टेशनमध्ये त्याने स्वत:ला पोलिसांच्या ताब्यात दिलं म्हणजेच सरेंडर केलं.