अभिनेता हृतिक रोशनशी गेटकीपरने केलं असभ्य वर्तन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हृतिकचा एक व्हिडीयो सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीयोमध्ये हृतिक आपली दोन मुलं रिदान आणि रेहान यांच्यासोबत दिसून येतोय. हृतिक काही कारणास्तव आपल्या मुलांसोबत रूग्णालयात गेला होता. दरम्यान रूग्णालयाच्या गेटकीपरने त्याला अडवलं आणि त्याच्याशी असभ्य वर्तन केल्याचं समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

गेटकीपरच्या असभ्य वर्तनामुळे हृतिकचाही संताप अनावर झाला आणि त्याने संबंधित गेटकीपरला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. या व्हिडीयोमध्ये हृतिक त्या गेटकीपरवर चांगलाच चिडलेला दिसत असून गेटकीपरला ‘अरे तो बोलो ना ऐसे’ असं म्हणतोय. हृतिकचा हा व्हिडीयो वुम्पला या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय.

हृतिकचा हा व्हिडीयो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडीयोवर कमेंट्स केल्या आहेत. हृतिकच्या चाहत्यांनी हा व्हिडीयो पाहिल्यावर रूग्णालयातील गेटकीपरच्या कृतीला चूक म्हणत हृतिकला समर्थन दिलं आहे. तर काही जणांनी आजपर्यत हृतिकला इतकं कधीच चिडलेलं पाहिलं नसल्याचं म्हटलंय.

हे वाचलं का?

नुकतंच हृतिकने त्याचा आगामी चित्रपट फायटर या सिनेमाची घोषणा केली होती. यामध्ये हृतिकसोबत अभिनेत्री दिपीका पदुकोण स्क्रिन शेअर करणार असल्याची चर्चा आहे. तर अलीकडे हृतिक वॉर या सिनेमात झळकला होता. यामध्ये त्याच्यसोबत टायगर श्रॉफची महत्त्वाची भूमिका असून बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच हीट झाला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT