बॉलिवूडचा भिडू जॅकी श्रॉफने दाखवला मनाचा मोठेपणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूडचा भिडू म्हणजेच सगळ्यांचा लाडका जग्गू दादा .जग्गू दादा नेहमीच माणुसकी जपताना दिसतात. ते नेहमीच आपल्यासोबत असणाऱ्या प्रत्येकाची आस्थेने चौकशी करतात,त्यांची विचारपूस करतात,त्यांना लागेल ती मदत करतात. पुन्हा एकदा बॉलिवूडच्या जग्गू दादाने त्याच्या मनाचा मोठेपणा दाखवला आहे. इतर अभिनेते त्यांच्या घरातील काम करणाऱ्या व्यक्तीच्या मनाचा फारसा विचार करताना दिसत नाहीत परंतु, जॅकी यांनी त्यांच्या वागण्याने जणू नवा पायंडा पडला आहे. त्यांच्या घरात घरकाम करणाऱ्या मुलीच्या कुटुंबातील एका सदस्याचं निधन झाल्याची त्यांना बातमी समजताच त्यांनी थेट तिच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

ADVERTISEMENT

त्यांच्या घरात घरकाम करणाऱ्या दीपाली तुपेच्या आजीचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. ही बातमी समजताच जॅकी तिच्या घरी म्हणजे पुणे जिल्ह्यातील मावळमधील पवनानगर येथे पोहोचले. वयाची शंभरी ओलांडलेली दिपालीची आजी म्हणजे तान्हाबाई ठाकर यांच्या निधनाची वार्ता समजताच जॅकी स्वतः तिच्या आजीच्या घरी गेले आणि त्यांनी दिपालीच्या कुटुंबाचं सांत्वन केलं. . ते नेहमीच त्याच्यातील माणुसकी जपताना दिसतात. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं याचा प्रत्यय त्यांच्या चाहत्यांना अनेकदा आला आहे. जॅकी यांनी अत्यंत हलाखीच्या दिवसांचा सामना केला आहे. आज त्यांना मिळालेलं यश हे प्रचंड अडचणींवर मात करून मिळालं आहे. त्यांचं बालपण एका मध्यमवर्गीय कुटुंबात गेलं. लहानपणी चाळीत राहिल्याने त्यांना इतरांच्या परिस्थितीची जाण आहे.

हे वाचलं का?

जॅकी श्रॉफ यांचा एक बंगला मावळ येथील चांदखेड येथेही आहे. कामामधून वेळ काढून ते सुट्टी घालवण्यासाठी अधूनमधून इथे येत असतात. अशाच एका भेटीदरम्यान त्यांना दिपालीच्या आजीच्या निधनाची वार्ता समजली. त्यानंतर जराही वेळ न दवडता त्यांनी तडक ठाकर कुटुंबाचं घर गाठलं आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. महत्वाचं म्हणजे जॅकी त्यांच्या घरातील एक सदस्य बनून तेथे गेले आणि थेट जमिनीवर बसून त्यांची विचारपूस करू लागले. एवढा मोठा माणूस आपल्या घरी आपलं सांत्वन करण्यासाठी आलं आहे हे पाहून त्यांचे कुटुंबीयदेखील भारावून गेले. सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे जमिनीवर बसून जॅकीने तिच्या घरातल्यांची चौकशी केली. जॅकीच्या या वागण्याचं सगळ्यांनाच अप्रूप वाटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT