निर्मात्याने हक्काचे पैसेच नाही दिले तर आम्ही घर कसं चालवायचं?
मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक मंदार देवस्थळीवर सध्या गंभीर आरोपांची मालिकाच सुरू आहे. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत,मृणाल दुसानीस,संग्राम साळवी आणि विदीशा म्हसकर या कलाकारांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत मंदार देवस्थळीवर पैसे बुडवल्याचा आरोप केला आहे. एका मनोरंजन वाहिनीवर सुरू असलेल्या मालिकेतील या कलाकारांना त्यांचे ठरलेले पैसे अजूनही मिळालेले नसल्याने तसेच खूप वेळ मंदार देवस्थळीकडून योग्य तो पाठपुरावा […]
ADVERTISEMENT
मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक मंदार देवस्थळीवर सध्या गंभीर आरोपांची मालिकाच सुरू आहे. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत,मृणाल दुसानीस,संग्राम साळवी आणि विदीशा म्हसकर या कलाकारांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत मंदार देवस्थळीवर पैसे बुडवल्याचा आरोप केला आहे. एका मनोरंजन वाहिनीवर सुरू असलेल्या मालिकेतील या कलाकारांना त्यांचे ठरलेले पैसे अजूनही मिळालेले नसल्याने तसेच खूप वेळ मंदार देवस्थळीकडून योग्य तो पाठपुरावा करूनही हाती निराशाच आल्याने या कलाकारांनी सोशल मिडीयावरच कामाचे पैसे थकल्याची पोस्ट केली आहे. तर दुसरीकडे या कलाकारांनी केलेले आरोप मान्य करत मंदार देवस्थळीनेही सोशल मिडीयावर पोस्ट करत मी पैसै देणं लागतो पण सध्या माझी परिस्थीती हलाखीची आहे, मला थोडा वेळ द्या मी कोणाचेही पैसे बुडवणार नाही असं सांगितलं आहे.
कलर्स मराठीवरील हे मन बावरे या मालिकेदरम्याने ह्या सगळ्या घटना घडल्या आहेत. याबद्दल अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि संग्राम साळवी यांच्याशी संपर्क केला असता याबद्दल सविस्तर माहिती मिळाली. हे मन बावरे ही मालिका सुरू असतानाच अनेक अडचणींना सुरवात झाली होती. मात्र आम्ही कलाकार असल्याने मालिका आणि निर्माता अडचणीत येऊ नये म्हणून वेळ आली तेव्हा पदरमोड करत किंवा अगदी घरचे कपडे आणायला लागले तरी आम्ही सर्व मदत मंदार देवस्थळीला केली आहे. पैसे देण्याची त्याची परिस्थीती नसतानाही आम्ही माणुसकीच्या नात्याने खूप दिवस थांबलो पण आमच्याही काही घरगुती अडचणी आहेत. आणि पाणी नाकाच्या वर जायला लागलं आणि पाठपुरावा करूनही हक्काचे आणि मेहनतीचे पैसे मिळत नाही म्हटल्यावर सोशल मिडीयावर पोस्ट करण्याशिवाय पर्याय नव्हता असं अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने सांगितले. आम्ही मंदार दादाला सांभाळून घेण्याचा,पर्यायाने अनेक दिवस थांबायचाही निर्णय घेतला. आम्हांला ही पोस्ट करून त्याची जाहिर बदनामी करायची आहे किंवा त्याला पाण्यात पाहायचं आहे असं मुळातच नाहीये. पण चँनेलकडून त्याला पैसे मिळाल्यावर त्याने काही जणांना त्याचं पेमंट तात्काळ करून दिलं. मग जे आम्ही ६ ते ७ महिने आमच्या पेमंटसाठी थांबलो आहे त्यांचं काय? आम्हीही त्याला वाईटातल्या वाईट प्रसंगी सांभाळूनच घेतलंय पण यामुळे आमच्या घरची परिस्थितीही तितकीच गंभीर बनत चाललीय त्याचं काय करायचं? आम्हांला कोणाला त्रास द्यायचा नाही पण आम्ही खूपवेळ थांबलो,खूप वाटही पाहिली पण आता गोष्टी हाताबाहेर जायला लागल्यानंतर ही पोस्ट आम्हांला टाकावीच लागली अशी माहिती अभिनेता संग्राम साळवीने मुंबई तकशी बोलताना दिली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
या सर्व आरोपांना मान्य करत निर्माता-दिग्दर्शक मंदार देवस्थळीने सोशल मिडीयावर सोमवारी सकाळी आपली बाजू मांडली आहे. मी अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांशी बोलतोय,मला पूर्ण जाणीव आहे की प्रत्येकालाच पैशांची गरज आहे,माझ्याकडून तुम्हा सगळ्यांच payment थकलं आहे,,तुमच म्हणणं योग्यच आहे,तुम्ही तुमच्या जागी बरोबरच आहात,पण मी सुध्धा अत्यंत आर्थिक बिकट परिस्थिती मधून जात आहे,मला खूप loss झाला आहे,त्यामुळे आत्ता पैसे देण्याची माझी खरच परिस्थिती नाही पण मी तुमच्या सगळ्यांचे सगळे पैसे देईन अगदी टॅक्स सकट, फक्त मला थोडा वेळ हवा आहे,कोणाचेच पैसे बुडवायचे माझ्या मनात नाही तशी माझी इच्छा ही नाही,पण आत्ता माझ्यावर सुध्दा आर्थिक संकट कोसळलय,मी खरच वाईट माणूस नाही माझी परिस्थिती वाईट आहे,मी यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतोय,देवांच्या कृपेने लवकरच परिस्थिती बदलावी इतकीच मनापासून इच्छा आहे आणि देवाकडे प्रार्थना…आत्तापर्यंत जो काही तुम्ही सपोर्ट केलात त्याबद्दल मी कायम तुमचा ऋणी आहे,आणि माझ्यामुळे जो काही त्रास सहन करावा लागतोय तुम्हाला त्याबद्दल मनापासून माफी मागतो . असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT